विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : स्वातंत्र्याच्या अमृतकालात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीच्या मुहूर्तावर 28 मे 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाची नवी संसद लोकार्पित करत आहेत. परंतु तिच्या उद्घाटन समारंभावर काँग्रेस सह सर्व विरोधकांनी राष्ट्रपतींना बोलावले नाही, याचे निमित्त करून बहिष्कार घातला आहे.PM Modi should name New Parliament Building – ‘Savarkar Sadan’: Mahatma Gandhi’s great-grandson
पण त्या पलीकडे जाऊन देशातल्या लिबरल्सचा अक्षरशः जळफळाट झाला आहे. नव्या संसद भवनाच्या उद्घाटनासाठी कोणताही अधिकृत उल्लेख न करता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी 28 मे हा दिवस निवडला आणि पंतप्रधानांना उद्घाटनाचे निमंत्रण दिले. तरीदेखील त्यातले सावरकर जयंतीचे औचित्य लपले नाही आणि म्हणूनच काँग्रेस सर्व विरोधकांचा जळफळाट झाला. त्यातच आता महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांची देखील भर पडली आहे. नव्या संसद भवनाला “सावरकर सदन” असेच नाव देऊन टाका, अशा शब्दात त्यांनी आपला जळफळाट व्यक्त केला आहे.
दादरचे सावरकर सदन
वास्तविक सावरकर सदन हे नाव काही नवीन नाही. खुद्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी बांधलेल्या स्वतःच्या मालकीच्या निवासस्थानाचे नाव त्यांनीच सावरकर सदन हेच ठेवले होते आणि आजही ते सावरकर सदन या नावानेच ओळखले जाते.
मुंबईतील दादरमध्ये बालमोहन शाळेनजीक असलेल्या या सावरकर सदनातच नेताजी सुभाष चंद्र बोस, पुरुषोत्तमदास टंडन, श्यामाप्रसाद मुखर्जी, के. एम. मुन्शी, आचार्य अत्रे, गोळवलकर गुरुजी आदी महान नेत्यांनी सावरकरांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्याची आठवण जपणारे छोटे स्मारकही आज सावरकर सदनात पाहायला मिळते.
पण केवळ नव्या संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 मे 2023 या सावरकर जयंतीला करणार असल्याने त्या संतापातून तुषार गांधींनी त्या नव्या संसद भवनाला सावरकर सदन नाव द्यावे, अशी जळफळाटी सूचना केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App