वाचा PFI ची मोडस ऑपरेंडी : नाव सेवाधारी कामांचे; अरब देशांमधून पैसे टेरर फंडिंगचे!!


वृत्तसंस्था/प्रतिनिधी

औरंगाबाद : भारतात घातपाती कारवायांसाठी टेरर फंडिंग करणारी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया PFI वर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. तिच्या शेकडो सदस्यांना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीतून काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. किंबहुना PFI ची मोडस ऑपरेंडी म्हणजे कार्यपद्धती कशी होती याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. “नाव सेवाधारी, पण काम टेरर फंडिंगचे” अशी ही मोडस ऑपरेंडी आहे!! अरब देशातून विविध सेवाधारी कामांसाठी कामांच्या नावाखाली बँक खात्यांमधून हा पैसा भारतातल्या खात्यांमध्ये जमा व्हायचा. त्यातला काही निधी सेवाधारी कामांसाठी वापरला जायचा आणि बाकीचा निधी “अन्यत्र गायब” व्हायचा!! महाराष्ट्रातून अटक केलेल्या पीएफ कार्यकर्त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली आहे.PFI modus operandi : in the name of social services used money for Terror funding 

 महाराष्ट्रातली कारवाई

22 सप्टेंबरला औरंगाबाद, नवी मुंबई, पुणे, मालेगाव, जालना, सोलापूर आदी शहरांमधून PFI च्या कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर त्यांची जी चौकशी केली, त्यामध्ये अरब देशांमधल्या बँक खात्यातून आलेल्या पैशाचे सोर्सेस समजले आहेत.

PFI कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या कारणांसाठी लोकशाहीवादी आंदोलन करण्यास चिथावणी देऊन पैसा पुरविला जात होता. त्याचबरोबर विशिष्ट दिवशी अन्नदान, आरोग्य तपासणी शिबिरे, सार्वजनिक सण समारंभ साजरे करणे
आदी कारणांसाठी या फंड मधला थोडा पैसा वापरला गेला. औरंगाबाद मध्ये “सेव्ह द रिपब्लिक” आंदोलन केले गेले. त्या आंदोलनात सामील होण्यासाठी कार्यकर्त्यांना पैसे वाटले होते. या पैसे वाटपाची साखळी अरब देशांपर्यंत पोहोचली आहे. त्याचा तपास महाराष्ट्र पोलीस एटीएस करत आहे. औरंगाबादमध्ये झालेल्या कार्यक्रमांना पैसा कुणी पुरवला, खर्च, व्यवहार कसा पार पडला?, याचा तपास सुरू आहे.

औरंगाबाद मधून शेख इरफान शेख सलीम ऊर्फ मौलाना इरफान मिल्ली (३७, रा. किराडपुरा), सय्यद फैजल सय्यद खलील (२८, रा. रोजेबाग), परवेज खान मुजम्मील खान (२९, रा. बायजीपुरा), अब्दुल हादी अब्दुल रऊफ (३२, रा. जालना), नासेर साबेर शेख (३७, रा. बायजीपुरा) यांना अटक केली आहे. औरंगाबादसह मराठवाड्यात संघटनेचे पसरलेले मोठे नेटवर्क या कारवाईतून समोर आले. तपास यंत्रणेने प्रतिबंधात्मक कारवाईत १४ जणांना नोटिसा देखील दिल्या आहेत.

मराठवाड्यातील औरंगाबाद जालना शहरांमध्ये पीएफआयने मोठे नेटवर्क उभे केले होते. त्यांच्यावरील छाप्यांमध्ये अनेक कागदपत्रे हाती आली आहेत. त्यातली बँक खाते गोठवली आहेत. त्यांचे मूळ सोर्सेस अरब देशांमध्ये आहेत. या संघटनेने काेराेना काळात अन्नदान, रक्तदान शिबिरे घेतली होती. गेल्या दीड वर्षामध्ये असे १३ पेक्षा अधिक कार्यक्रम घेतले होते. 2021 मध्ये काही बँक खाती पोलिसांनी सील केली होती. त्याच्या निषेधार्थ पीएफआय ने औरंगाबाद मध्ये स्थानिक पातळीवर १५ मार्च राेजी ‘सेव्ह द रिपब्लिक’ नावाने आंदोलन केले होेते. इतर नोंदींनुसार २६ जानेवारी रोजी कार्यालयावर ध्वजारोहण केले होते. १६ फेब्रुवारी रोजी स्थापना दिन साजरा केला होता, तर कोरोनाच्या दोन वर्षांमध्ये सातत्याने अन्नदान, रक्तदान शिबिरे घेतली होती.

 संघटनेचे सदस्य अत्यल्प उत्पन्न गटातले

PFI पीएफआय संघटनेचे बहुतांश समर्थक अत्यल्प उत्पन्न गटातले आहेत. त्यात प्रामुख्याने छोटे किराणा दुकानदार, व्यावसायिक, कपडे विक्रेता, पीओपी कारागीर, मिस्त्री कामगार, किचन ट्रॉली कारागीर, अरबी शिक्षक, मार्केटिंगचे काम करणारे तरुण असल्याचे प्राथमिक चाैकशीत स्पष्ट झाले आहे. या सर्वांच्या बँक खात्यांमध्ये अरब देशातून कधी ना कधीतरी पैसे आल्याचे आढळले आहे.

दक्षिणेकडील राज्यांमध्ये जास्त पैसा

अरब देशातील 500 हून अधिक खाती केंद्रीय तपास संस्था एनआयएच्या रडारवर आहेत. या खात्यांमधून केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगण कर्नाटक या चार राज्यांमधल्या पीएफआय सदस्यांच्या खात्यांमध्ये सर्वाधिक पैसा आल्याचे तपासात आढळले आहे.

PFI modus operandi : in the name of social services used money for Terror funding

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय