PF Fraud : कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा काही भाग भविष्य निर्वाह निधी (पीएफ) म्हणून कापला जातो, जेणेकरून त्याचा वापर भविष्यातील गरजांसाठी करता येईल. पण PFच्या नावाने फसवणुकीचे एक धक्कादायक प्रकरण मुंबईच्या अंधेरी भागातून समोर आले आहे. येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून पीएफचे पैसे कापले गेले, पण ते पैसे पीएफ कार्यालयात जमाच झाले नाहीत. PF Fraud of more than one crore rupees in Mumbai, police registered a case
विशेष प्रतिनिधी
मुंबई : कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा काही भाग भविष्य निर्वाह निधी (पीएफ) म्हणून कापला जातो, जेणेकरून त्याचा वापर भविष्यातील गरजांसाठी करता येईल. पण PFच्या नावाने फसवणुकीचे एक धक्कादायक प्रकरण मुंबईच्या अंधेरी भागातून समोर आले आहे. येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून पीएफचे पैसे कापले गेले, पण ते पैसे पीएफ कार्यालयात जमाच झाले नाहीत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएफच्या नावावर कापलेली ही रक्कम एक कोटीहून अधिक आहे. ओशिवरा पोलिसांनी आरोपी व्यक्तीविरोधात भादंविच्या कलम 406 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याचा तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सिक्युरिटी गार्ड ‘Agile Security Force and Systems Private Limited’ नावाच्या कंपनीत काम करत होते. कंपनीच्या वतीने त्यांना बँक ऑफ बडोदामध्ये ड्युटीवर ठेवण्यात आले. एप्रिल 2017 ते मार्च 2021 पर्यंत या सुरक्षा रक्षकांच्या पगारापासून पीएफच्या नावाने पैसे कापले गेले पण ते भविष्य निर्वाह निधीच्या कार्यालयात जमा झाले नाहीत.
PF च्या नावावर एक कोटी 3 लाखांपेक्षा जास्त रक्कम कापली
ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बेंडाळे म्हणाले, “आम्हाला पीएफ कार्यालयातील एका अधिकाऱ्याकडून तक्रार होती. त्यानंतर त्यांच्या तक्रारीच्या आधारावर आम्ही सतनाम मैनी नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी व्यक्तीने पीएफच्या नावावर या सुरक्षा रक्षकांच्या पगारातून एक कोटी 3 लाखांपेक्षा जास्त रक्कम कापली होती. आरोपीने ही रक्कम त्याच्या वैयक्तिक वापरासाठी वापरली होती. पोलीस आता या प्रकरणाची चौकशी करत आहेत आणि ही रक्कम कोणत्या हेतूसाठी वापरली गेली हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
PF Fraud of more than one crore rupees in Mumbai, police registered a case
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App