कोविड नियमांचा भंग झाल्यास ५० हजारापर्यंत दंड, सातत्याने नियमभंग केल्यास अटकही


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. कोविड नियमांचा भंग केल्यास पन्नास हजारापर्यंत दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी, प्रवासात मास्क वापरणे आणि कोविड प्रतिबंधक व्यवहार बंधनकारक असणार आहे.Penalty up to Rs 50,000 for violation of Kovid rules, arrest for continuous violation

लोकल ट्रेन, मेट्रो, मोनो, बस, टॅक्सी-रिक्षात मास्क बंधनकारक आहे. मास्क नसल्यास ५०० रुपये दंड आकारण्यात येईल. खासगी वाहनात एकाच कुटुंबातील व्यक्ती नसतील तर मास्क लावणे आवश्यक असेल.
राज्य शासाने जारी केलेल्या नियमावलीनुसार, एखाद्या संस्थेत, आस्थापनेत नियमभंग झाल्यास वैयक्तिक दंड होणार असूनत्याचबरोबर आस्थापनेला १० हजारांचा दंड केला जाणार आहे. एखाद्या संस्था किंवा आस्थापनेकडून मार्गदर्शक सूचनांचा भंग झाल्यास ५० हजारांचा दंड लागू केला जाईल. टॅक्सीसह अन्य वाहनात कोविड नियमांचे पालन होत नसल्यास

संबंधित प्रवासी आणि वाहनचालक, कंडक्टर यांस ५०० रुपये दंड. तर, बसमध्ये नियमांचे पालन न झाल्यास ट्रान्सपोर्ट एजन्सीला १० हजार रुपयांचा दंड होणार आहे. एखाद्याकडून सातत्याने नियमभंग होत असल्यास कायद्यानुसार अटकेची कारवाईही केली जाणार आहे.

Penalty up to Rs 50,000 for violation of Kovid rules, arrest for continuous violation

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण