नोटीस न येताही ईडीकडे जाण्याचा इशारा देणारे पवार प्राप्तिकर खात्याच्या छाप्यानंतर नुसती तोंडी प्रतिक्रिया देऊन गप्प का??


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्य शिखर बँक प्रकरणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सक्तवसुली संचालनालय ईडी नोटीस पाठविले नव्हती. त्यासंदर्भात फक्त बातम्या प्रसार माध्यमांमध्ये आल्या होत्या. त्यावेळी स्वतःहून ईडीच्या कार्यालयात चौकशीला जाण्याचा इशारा देणारे पवार काल आणि आज प्राप्तिकर खात्याच्या प्रत्यक्ष छाप्याच्या कारवाया सुरू असताना नुसती तोंडी प्रतिक्रिया देऊन का गप्प बसले आहेत?, याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. Pawar, who warned to go to ED even without notice, is silent by giving only verbal response after the raid of income tax department ??

2019 मध्ये शिखर बँक घोटाळा प्रकरणात कायदेशीर कागदपत्रांमध्ये शरद पवारांचे नाव होते. त्यावरून त्यांना नोटीस पाठवण्यात आल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांनी दिल्या होत्या. प्रत्यक्षात त्यांना ईडीने नोटीस पाठवलेली नव्हती. तरी देखील मी स्वतः त्यांच्या कार्यालयात जाऊन चौकशीला सामोरा जातो, असा इशारा पवार यांनी दिला होता. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ईङीच्या निमित्ताने चेतवण्याचाच पवारांचा प्रयत्न होता. अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मुंबईत जमा होण्याचे मनसुबे पण रचले होते. या निमित्ताने एक राजकीय शो राष्ट्रवादीला तिथे करता आला असता. परंतु त्यावेळच्या मुंबई पोलिसांनी अशा स्वरूपाचा राजकीय पेच प्रसंग टाळला. ईडीची नोटीस आली नसल्याने आपण तिथे जाऊ नये अशी पोलीस अधिकाऱ्यांनी पवारांना सिल्वर येथे जाऊन विनंती केली होती. या एपिसोडचा पवारांनी राजकीय फायदा करून घेतला.परंतु, आता प्रत्यक्ष प्राप्तिकर खात्याचे छापे फक्त अजित पवारांच्या नव्हे तर शरद पवारांच्या ही नातेवाईकांवर पडत आहेत. यात पार्थ पवार, विजया पाटील यांचे देखील समावेश आहेत. अशी प्रत्यक्ष कारवाई सुरू असताना पवारांनी हा केंद्रीय तपास संस्थांच्या अधिकारांचा अतिरेक आहे. केंद्र सरकारला लखीमपुर-खीरीच्या प्रकरणावरून मी दिलेल्या प्रतिक्रियेचा राग आला असावा म्हणून ही कारवाई सुरू आहे, असे म्हटले आहे.

पण नुकतीच अशी तोंडी प्रतिक्रिया व्यक्त करून पवार का गप्प बसले आहेत? ईडीची नोटीस आलेली नसताना त्याचा राजकीय एपिसोड करून राष्ट्रवादीसाठी लाभ मिळवून घेणारे पवार प्रत्यक्ष कारवाई सुरू असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एकत्र का करत नाहीत? चौकशीला सामोरे का जात नाहीत? प्राप्तिकर खात्याच्या छाप्यांमधून आणखी काही वेगळे बाहेर येण्याची शक्यता आहे का? वैयक्तिक व्यवहारांपर्यंतची अशी कोणती प्रकरणी बाहेर येतील? की जी राष्ट्रवादीला राजकीयदृष्ट्या अडचणीत असणारी आहेत, असे प्रश्न राजकीय वर्तुळात विचारले जाऊ लागले आहेत.

Pawar, who warned to go to ED even without notice, is silent by giving only verbal response after the raid of income tax department ??

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”