विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर: आज राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ केली. परंतु विलिनीकरण करण्याची मागणी मान्य केलेली नाही. त्यामुळे एसटी कर्मचारी उद्या गुरुवारी सकाळी संप मागे घेण्याबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत.
Passengers in Kolhapur stand keep waiting for ST buses to start
आझाद मैदानावर एसटी कर्मचारी एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे म्हणून आंदोलन करत आहेत. संपाबाबत घोषणा आझाद मैदानावर उद्या केली जाईल. कोल्हापूर येथील एसटी कर्मचारी म्हणाले की घोषणा झाल्यानंतरच कोल्हापुरातील संप मागे घेण्याबाबत निर्णय घेतला जाईल.
एसटी कर्मचाऱ्यांनी जल समाधी घेण्याची धमकी दिल्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी 20 कर्मचाऱ्यांना घेतले ताब्यात
कोल्हापूर येथे बस स्थानकात एसटी सुरू होईल या अपेक्षेने प्रवासी आले होते. परंतु मध्यवर्ती बस स्थानकातील संपकरी कर्मचारी साडेआठ नंतर निघून गेले व प्रवासी बस सुरू होईल या अपेक्षेने तिथेच थांबले. कोल्हापूर येथील बस वाहतूक सुरू होण्यासाठी एसटी प्रशासनाच्या कडून कोणताही निर्णय झाला नसल्याने कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानका मध्ये बऱ्याच एसटी बस डेपोमध्ये थांबल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App