विशेष प्रतिनिधी
जालना : मराठवाड्यातील प्रवाशांसाठी पुण्याला जाण्यासाठी आज नव्या रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. विशेष म्हणजे रेल्वेमुळे प्रवाशांचे तिकिटाच्या भाड्यासाठी होणारा मोठा खर्च वाचणार आहे. Passenger fares from Nanded to Hadapsar Save money; Second class ticket Rs १८५
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते रेल्वेला जालन्यातून हिरवा झेंडा दाखविण्यात आला. एरवी पुण्याला जाण्यासाठी बस किंवा ट्रॅव्हल्सने ५०० ते ८०० रुपये भरावे लागतात. त्या तुलनेत रेल्वेचे तिकिट अत्यंत स्वस्त आहे. द्वितीय श्रेणी तिकिटासाठी १८५ रुपये भरावे लागतील. तर स्लीपर कोचसाठी ३१५ रुपये आकारले जातील. त्यामुळे पुण्याला जाण्यासाठी प्रवाशांना ही रेल्वे फारच सोयीस्कर ठरणार आहे.
रावसाहेब दानवे म्हणाले, नांदेड, जालना,परभणी, औरंगाबाद वरून पुण्याला जाणाऱ्यांसाठी रेल्वेकडून नवीन वर्षाचे गिफ्ट मिळाले आहे. सध्या प्रवाशी पुण्याला जाण्यासाठी ट्रॅव्हलने प्रवास करतात. सध्या जालनेकर पुण्याला जाण्यासाठी ५०० ते ८०० पर्यंत भाडे मोजतात. आता मात्र जालन्यातून पुण्याला जाण्यासाठी कमी पैशात प्रवास करता येणार आहे.
अत्याधुनिक डबे, सुपरफास्ट एक्सप्रेस
पुणे-नांदेड- पुणे ही गाडी यापूर्वी परळीमार्गे सुरु होती. कोरोनाकाळात ती बंद केली. आता ती थेट मराठवाडा मार्गावरून धावणार आहे. मनमाड येथून ही गाडी पुण्याकडे वळणार आहे. तसेच सचखंड एक्सप्रेससासरखे एलएचबी डबे गाडीला जोडले आहेत. यामुले डिस्कब्रेक, सस्पेन्शन आदी बाबी तसेच अद्ययावत सुविधायुक्त असल्याने गाडीला गती मिळणार आहे.
रेल्वेची वेळ
पुण्यासाठीची रेल्वे–
नांदेडवरून रात्री ८.३० वाजता, रात्री ११.३० वाजता जालना आणि पुण्यात पहाटे पोहोचेल. जालनेकरांसाठी हा ६५२ किमीचा प्रवास असेल.
नांदेडला जाण्यासाठी–
रेल्वे-पुण्यावरून रात्री ११.३० वाजता निघणार, सकाळी ८.३५ वाजता जालन्यात आणि पुढे ११.३० वाजता नांदेडमध्ये ही रेल्वे पोहोचेल.
नांदेड ते हडपसर तिकिट दर
नांदेड ते हडपसर येथे जाण्यासाठी फर्स्ट एसी- १९०५ रुपये , सकेंड एसी १९९५ रुपये, थर्ड एसी- ८१० रुपये , स्लीपर कोच ३१५ रुपये, द्वितीय श्रेणी १३५ रुपये, थर्ड इकोनॉमी- ७५० रुपये असे दर आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App