अनिल देशमुख यांच्याविरोधातील मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा जबाब नोंदवला आहे.PARMBIR SINGH: ED reported Parambir Singh’s reply
विशेष प्रतिनिधी
मुंबई:अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील मनी लाँड्रिंग प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांचा जबाब नोंदवला आहे.
3 डिसेंबरच्या सकाळी तीन समन्सनंतर परमबीर सिंग ईडी अधिकाऱ्यांसमोर हजर झाले ईडी मुंबईच्या उपसंचालकांच्या उपस्थितीत अनेक तास त्यांची चौकशी केली
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या Money Laundering प्रकरणात ED ने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा जबाब नोंदवला आहे. ३ डिसेंबरला परमबीर सिंग ईडी अधिकाऱ्यांसमोर हजर झाले होते. यावेळी ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत परमबीर सिंग यांचा जबाब नोंदवण्यात आला.
परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर १०० कोटींच्या खंडणीचे आरोप केले होते. सीबीआयने या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केल्यानंतर ईडीने यात अनिल देशमुखांविरुद्ध मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात ईडीने याआधीच अनिल देशमुख यांचे PA आणि PS यांना अटक केली आहे. याचसोबत अनिल देशमुखांचा मुलगा ऋषिकेशलाही ईडीने अटक केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App