प्रतिनिधी
मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर रात्री उशिरा ही भेट झाली. जवळपास 15 ते 20 मिनिटे त्यांच्यात चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.Parambir Singh met Chief Minister Shinde Anil Deshmukh was accused of extortion of 100 crores in discussion
विविध चर्चांना उधाण
परमबीर सिंह यांनी यांनी केलेल्या आरोपांमुळे अनिल देशमुखांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईतील बार आणि रेस्तराँमधून दरमहा 100 कोटी रुपये वसुलीचा आरोप परमबीर सिंहांनी केला होता.
देशमुख यांना नुकताच जामीन मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर परमबीर सिंहांनी सीएम शिंदेंची भेट घेणे महत्त्वाचे मानले जात आहे. यामुळे आता पुन्हा अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App