Parambir Singh : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग मुंबईत दाखल

परमबीर सिंह हे मुंबईत दाखल झाल्याने आता अनिल देशमुख यांच्या वसुली प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे.Parambir Singh: Former Commissioner of Police Parambir Singh arrives in Mumbai


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह अखेर मुंबईत दाखल झाले आहेत. परमबीर सिंह यांना मुंबईसह विविध ठिकाणी दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये कोर्टाने फरार घोषित केले होते. ते गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होते. दरम्यान मुंबई गुन्हे शाखेच्या कांदिवली कार्यालयात ते आज हजर झाले आहेत.

परमबीर सिंह हे देश सोडून पळून गेले आहेत असे अनेक दावे केले जात होते. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने देखील आपण कुठे आहात असा सवाल? परमबीर सिंग यांना केला होता. त्यानंतर आज अचानक परमबीर सिंग मुंबईत दाखल झाले आहेत.परमबीर सिंह हे मुंबईत दाखल झाल्याने आता अनिल देशमुख यांच्या वसुली प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे.

यावेळी परमबीर सिंग म्हणाले की , मी इथे चौकशीसाठी आलो आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने इथे आलो असून चौकशीला मी सामोरं जाणार आहे.मला ज्या काही केसेसमध्ये अधकवण्यात आले आहे. मला इथे काहीही बोलायचं नाही, मला जे काही बोलायचं आहे ते मी कोर्टातच बोलेन.देशाच्या न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. मला न्याय मिळेल’, अशी आशा आहे.’ असं परमबीर सिंग यावेळी म्हणाले.गेल्या अनेक दिवसांपासून परमबीर सिंग हे चंदीगडमध्येच राहत होते. ‘मुंबईत आपल्या जीवाला धोका आहे, त्यामुळे आपण तिथे येऊ शकत नाही’, असे त्यांनी आपल्या वकिलांमार्फत कोर्टाला सांगितले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारले आणि तपासात सहभागी होण्याचे निर्देश दिले होते. आता परमबीर सिंग तपासात सहभागी होण्यासाठी मुंबईत आले आहेत.

व्यावसायिकाकडून खंडणी मागितल्याच्या कथित गुन्ह्यात आरोप म्हणून परमबीर सिंह यांना मुंबईतील अतिरिक्त मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने फरार घोषित केले होते. परमबीर यांच्याबरोबरच आरोपी निलंबित पोलिस अधिकारी रियाज भाटी व विनय सिंह उर्फ बबलू यांनाही न्यायालयाने फरार घोषित केले.

दरम्यान जर ३० दिवसांच्या आत परमबीर सिंग कोर्टात हजर न राहिल्यास कायद्यानुसार त्याची मालमत्ताही जप्त केली जाऊ शकते. अशा परिस्थितीत ही कारवाई टाळण्यासाठी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तपासात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. आता या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात ६ डिसेंबरला सुनावणी होणार आहे.

Parambir Singh: Former Commissioner of Police Parambir Singh arrives in Mumbai