परमवीर सिंग बोलताहेत एनआयएशी आणि सीबीआयशी बोलणार जयश्री पाटील; दोघांची होतेय जबाबनोंदणी


वृत्तसंस्था

मुंबई – मुंबईचे बदली करण्यात आलेले पोलीस आयुक्त आज बोलताहेत. ते एनआयए आणि सीबीआय या दोन्ही संस्थांच्या अधिकाऱ्यांपुढे जबाब नोंदविणार आहेत. सध्या परमवीर सिंग हे एनआयएच्या कार्यालयात आहेत. तेथे सचिन वाझे – अँटिलिया स्फोटके प्रकणात आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात त्यांची जबाब नोंदणी सुरू आहे.  Param Bir Singh’s corruption allegations against Anil Deshmukh: CBI to record the statement of the complainant, Dr Jaishri Patil, today



तर परमवीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात जो १०० कोटींच्या खंडणी वसूलीचा आरोप लावला आहे, त्या संदर्भात तक्रारदार जयश्री पाटील यांचा जबाब सीबीआयचे अधिकारी आज नोंदवून घेणार आहेत.

अँटिलिया स्फोटके आणि सचिन वाझे तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणात परमवीर सिंग यांची एनआयएच्या कार्यालयात जबाब नोंदणी सुरू आहे. ते सकाळीच एनआयए कार्यालयात दाखल झाले आहेत.

उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरणाशी संबंधित व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवला होता. या प्रकरणाचा तपास राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून (एटीएस) सुरू होता.

मनसुख आणि अटक आरोपी सचिन वाझे यांच्यात मैत्री होती. मनसुख यांची स्कॉर्पिओ चोरी झालीच नव्हती तर ती वाझे यांच्या ताब्यात होती, वाझे यांनीच ही गाडी अंबानी यांच्या निवासस्थानाजवळी उभी केली, असा संशय एनआयएला आहे. सचिन वाझे यांच्या अटकेनंतर एनआयएने गुन्हे शाखेचे ७ अधिकारी, अंमलदारांची चौकशी केली आहे. त्यात १ सहायक आयुक्त, १ निरीक्षक, २ सहायक निरीक्षक आणि ३ अंमलदारांचा समावेश आहे.

Param Bir Singh’s corruption allegations against Anil Deshmukh: CBI to record the statement of the complainant, Dr Jaishri Patil, today

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात