पंकजा मुंडे – ओबीसी , मराठा आरक्षणावर महाराष्ट्रात असंतोष आहे

विशेष प्रतिनिधी

नवि दिल्ली : आरक्षणावरून महाराष्ट्रात ओबीसी आणि मराठा समाजामध्ये असंतोष पहायला मिळत आहे. त्यामुळे अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्र सरकारलाही काही बदल करावे लागतील, असे मत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी दिल्ली येथे मांडले.Pankaja Munde – OBC, There is dissatisfaction in Maharashtra over Maratha reservation

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, महाराष्ट्रात ओबीसींचे आरक्षण ५० टक्क्यांहून अधिक होत असल्याने या मर्यादेहून अधिकचे आरक्षण रद्द होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, सर्वच आरक्षण रद्द झाले.



मराठा बांधवांना देण्यात आलेले आरक्षणही रद्द झाले आहे. यामुळे मराठा व ओबीसी समाजात असंतोष आहे. इतर राज्यांनी आपल्या पातळीवर निर्णय घेतले आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी देत महाविकास आघाडी सरकारला देखील सूचना वजा माहिती दिली आहे.

भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी बोलावलेल्या सचिवांच्या बैठकीसाठी पंकजा मुंडे दिल्लीत आल्या होत्या. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील सहकार, राजकीय स्थिती तसेच इतर महत्त्वाच्या विषयांकडे लक्ष वेधले.

देशातील महागाई, पेट्रोल, डिझेलचे वाढते दर, यावर भाष्य करताना त्या म्हणाल्या, यावर तोडगा काढण्याची गरज आहे. गरीब, सामान्य माणसांना चांगले दिवस यायला हवेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ध्येयही ते आहे. त्यावर लवकर तोडगा निघेल, असा आपणास विश्वास आहे.

Pankaja Munde – OBC, There is dissatisfaction in Maharashtra over Maratha reservation

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात