पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना सोडणार नाही ; देवेंद्र फडणवीसांचा इशारा


प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात आणि देशात कोणी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देत असतील तर तर त्यांना सोडणार नाही. ते जिथे असेल तिथून शोधून काढून त्यांच्यावर कारवाई करू, असा गंभीर इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. Pakistan will not spare the slogans of Zindabad

दहशतवादी संघटनांना आर्थिक रसद पुरवणारी म्हणजेच टेरर फंडिंग करणारी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया हिच्यावर राष्ट्रीय तपास संस्था एनआयए आणि सक्तवसुली संचलनालय ईडी यांनी कारवाई केल्यानंतर देशभरात पीएफआय संघटनेच्या पाठीराख्यांनी निदर्शने केली. केरळमध्ये हिंसक आंदोलन केले. याच संघटनेच्या पाठीराख्यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करताना त्यांची मजल पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा करण्यापर्यंत गेली.

या मुद्द्यावरून महाराष्ट्रातले राजकीय वातावरण तापले असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची प्रतिक्रिया आली आहे. पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. ते जिथे असतील तिथून शोधून काढून त्यांच्यावर कारवाई करू, असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे.

Pakistan will not spare the slogans of Zindabad

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण