वृत्तसंस्था
पाचगणी : महाराष्ट्राचे मिनी कश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाचगणी हे रविवारी पुण्या-मुंबईवरून येणाऱ्या पर्यटकांनी फुलले होते. कोरोनावरील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करताच ही गर्दी झाली. वाहनांच्या रांगेमुळे राहदारीवर परिणाम झाला. Paachgni Full of tourists , traffic jams on the road leading to Tableland
आशिया खंडातील सर्वांत मोठे पठार असलेल्या येथील टेबललॅण्डवर जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. कोरोनामुळे गेल्या पाच महिन्यांपासून पाचगणीचे पर्यटन ठप्प झाले होते. अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. रविवारचा दिवस सुटीचा असला तरी पर्यटकांनी पाचगणी भरगच्च झाले होते. त्याचा त्यांना मोठा आनंद झाला. निर्बंध शिथील केले आहेत. पण, कोरोना संपलेला नाही, याचे भान पर्यटकांनी ठेवावे, असे स्थानिकांना वाटत आहे . त्यामुळे पर्यटकांनी जरा सबुरीने टप्प्याटप्प्याने पर्यटनस्थळी दाखल होण्याची गरज स्थानकांनी व्यक्त केली.
पाचगणी-महाबळेश्वर परिसरात पाच महिन्यांनंतर पर्यटकांची झालेली गर्दी पाहिल्यानंतर महाराष्ट्राचे नंदनवन पुन्हा पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेले आहे. हे पर्यटक पाचगणीच्या आल्हाददायक वातावरणाचा मनसोक्त आनंद घेताना दिसत होते. दरम्यान, सातारा जिल्हा कोरोनाशी दोन हात करीत असताना पुण्या-मुंबईहून आलेल्या पर्यटकांनी पाचगणीमधील टेबललॅण्डवर जाण्यासाठी गर्दी केल्यानेमोठी वाहतूक कोंडी झाली होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App