परळीच्या थर्मलमधील ऑक्सिजन निर्मिती प्लांट हा अंबाजोगाईच्या ‘स्वाराती’मध्ये शिफ्ट होणार आहे.
विशेष प्रतिनिधी
बीड : कोरोनाच्या वाढत्या भीषण प्रादुर्भावामुळे बीडजिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन परळीच्या थर्मल पॉवर प्लांटमधील युनिट क्र. 8चा ऑक्सिजन निर्मिती प्लांट हा अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात शिफ्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . Oxygen Plant for Covid Paitents : Oxygen shortage in Beed moved the oxygen production plant from Parali
थर्मल पावर प्लांटमधील या ऑक्सिजन निर्मिती प्लांटद्वारे दर तासाला 86 हजार लिटर ऑक्सिजन हवेतून वेगळा करण्याची क्षमता आहे. त्यामुळे अंबाजोगाई येथील एसआरटी ग्रामीण रुग्णालयात चोवीस तासात साधारण 300 जम्बो सिलेंडर ऑक्सिजन तयार होईल व यामुळे येथील ऑक्सिजनचा तुटवडा कायमचा मिटणार आहे.
परळी औष्णिक विद्युत केंद्रात वीजनिर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यात शेवाळ साठून पाणी खराब होऊ नये यासाठी हा ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित करण्यात येतो. केंद्रातील युनिट क्र.6 व 7 मधील ऑक्सिजन प्लांट पूर्ववत राहतील. युनिट क्र.8 मधला प्लांट मात्र अंबाजोगाईला शिफ्ट करण्यात येत आहे.
ऑक्सिजन रिसिव्हर टॅंकची क्षमता एकावेळी 20 हजार लिटर इतका ऑक्सिजन साठवून ठेवण्याइतकी एसआरटी रुग्णालयातील ऑक्सिजन रिसिव्हर टॅंकची क्षमता एकावेळी 20 हजार लिटर इतका ऑक्सिजन साठवून ठेवण्याइतकी आहे, त्यामुळे येथे आता ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App