उस्मानाबाद : २ लाखासाठी-पती पत्नीला चाबकाचे फटके-नग्न उभं राहुन विष्ठा खायला भाग पाडले !विषप्राशनाने पतीचा मृत्यू पत्नी बचावली;जातपंचायतीचा भीषण चेहरा…


उस्मानाबाद जिल्ह्यातच स्त्री शक्तीचा जागर केल्या जाणाऱ्या घटस्थापनेच्या दिवशी जात पंचायतीकडून महिलेस नग्न करत मारहाण केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.


ढोकी गावातली घटना, दोन आरोपींना अटक


विशेष प्रतिनिधी

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात जातपंचायतीच्या जाचाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या केल्याच्या प्रकरणात 2 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. ढोकी या गावातील आरोपी पंच कालिदास काळे (वय 70) व दादा चव्हाण (वय 30) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. जातपंचायत छळ व आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणी ही अटक केली आहे. Osmanabad: For Rs 2 lakh, the husband whipped his wife and forced her to eat excrement while standing naked! Poisoning saved the death of his wife;

पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही घटना आहे. उस्मानाबाद येथील काका नगर भागात राहणाऱ्या एका दाम्पत्याला जातपंचायती कडून ही अमानुष वागणूक दिली गेली. गेल्या आठ वर्षांपासून जातपंचायतीकडून सुरू असलेल्या या त्रासाला कंटाळून संबंधित दाम्पत्यानं विष प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये पतीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून पत्नी बचावली आहे. त्यामुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी बुधवारी मध्यरात्री आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

आनंद नगर पोलीस ठाण्यात 25 जणांसह इतर 10 ते 15 जणांवर आत्महत्यास प्रवृत्त केल्याचा व जातपंचायत प्रतिबंधक गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जातपंचायतीने जमिनीच्या व्यवहारात पती-पत्नीला ठोठावलेला 2 लाख रुपयांचा दंड न दिल्याने वाळीत टाकत त्यांचा छळ केला जात होता. दंड न दिल्याने काटेरी चाबकाचे फटके मारून जबरदस्तीने विष्ठा खायला भाग पडल्याचा तर पीडित महिलेला जातपंचायतसमोर नग्न उभे केल्याचा आरोप केला जात आहे. जात पंचायतीच्या शिक्षेत अपमान झाल्याने खचून पती-पत्नी यांनी 24 सप्टेंबर रोजी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता ज्यात पतीचा 4 ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला.जातपंचायतीने अपघातातील मयताच्या नुकसान भरपाई पोटी 4 एकर जमीन व 7 लाख दंड न दिल्याने पून्हा जातपंचायतने 2 लाख दंड ठोठावला त्यातील 20 हजार दिले व उरलेली रक्कम 4 दिवसात देण्यास मुदत दिली मात्र पैसे न जमा झाल्याने खचून पती पत्नी जोडप्याने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला यात सोमनाथ काळे यांचा सोलापूर येथे उपचार दरम्यान मृत्यू तर फिर्यादी पत्नी सुनीता काळे या बचवल्यानंतर या जातपंचायत छळाच्या प्रकरणाला वाचा फुटली. या प्रकरणात दोषींवर कारवाई करावी अशी मागणी मयताच्या नातेवाईक यांनी केली आहे.

या प्रकरणातील मयत सोमनाथ काळे यांच्याकडून काही दिवसांपूर्वी एक अपघात झाला होता. या अपघातात एकाचा जीव गेल्यामुळे जात पंचायतीने नुकसान भरपाईपोटी ४ एकर जमीन आणि ७ लाख रुपये दंड ठोठावला. दंडाची ही रक्कम न भरल्यास पंचायतीने आणखी २ लाखांचा दंड ठोठावला. यावेळी सोमनाथ काळे यांनी दंडातली २० हजार रक्कम देऊन उर्वरित रक्कम ४ दिवसांत देण्याची मुदत मागितली. परंतू पैसे जमा न झाल्यामुळे पती सोमनाथ काळे आणि पत्नी सुनीता काळे यांनी विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला.

यादरम्यान सोमनाथ काळे यांचा सोलापूरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. पत्नी सुनीता काळे यांचा जीव वाचवल्यानंतर त्यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर प्रकरणाला वाचा फुटली आहे. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी मयताच्या नातेवाईकांनी केली आहे. परंतू महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात जात पंचायतीचा असलेला भीषण पगडा या निमीत्ताने पुन्हा एकदा समोर आला आहे.

Osmanabad: For Rs 2 lakh, the husband whipped his wife and forced her to eat excrement while standing naked! Poisoning saved the death of his wife

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”