बलुचिस्तानला भूकंपाचा धक्का ,२२ ठार तर ३०० जखमी


विशेष प्रतिनिधी

कराची – बलुचिस्तानातील हरनईसह सहा जिल्ह्यांत भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. यात २२ जण मृत्युमुखी पडले असून ३०० हून अधिक जखमी झाले. या भूकंपामुळे शेकडो घरांची पडझड झाली आहे. भूकंपाची तीव्रता रिश्टेर स्केलवर ५.९ इतकी नोंदली गेली.Earthquake in Baluchistan kills several peopels

नागरिक गाढ झोपेत असताना अचानक जमीन हादरल्याने घबराट पसरली. त्यामुळे नागरिक जीव मुठीत घेऊन घराबाहेर पळाले.झोपेत असलेल्या नागरिकांना अचानक जमीन हलत असल्याचा भास झाला.त्यामुळे भयभीत होऊन घराबाहेर पळाले. भूकंपाचा केंद्रबिंदू हा हरनई येथे पंधरा किलोमीटर खोलीवर होता. बलुचिस्तानातील हरनई जिल्ह्याबरोबरच क्वेटा, सिबी, पिशीन, किला सैफुल्लाह, चमन, झियारत, झोओब या जिल्ह्यांना भूकंपाचे धक्के बसले.

बलुचिस्तानात यापूर्वी २०१३ रोजी अवरान जिल्ह्यात भूकंपाचा तीव्र धक्का बसला होता. त्यात सुमारे ८२५ नागरिकांचा मृत्यू झाला तर हजारो नागरिक जखमी झाले होते.

Earthquake in Baluchistan kills several peopels

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”