विशेषत: कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरात शहरांतर्गत नाकाबंदी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.On the backdrop of 31st December, Kolhapur police planned a tight blockade in the district
विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : नव्या वर्षाची सुरुवात दणक्यात करण्यासाठी आतापर्यंत अनेकांनीच काही बेत आखले असतील. काहींनी कोरोनाच्या संकटाला अनुसरून हे बेत आखले असतील.याच सर्व वातावरणात आता प्रशासनाकडून नागरिकांसाठी 31 डिसेंबरसाठी काही नवे नियम देण्यात आले आहेत.
दरम्यान 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवरती कोल्हापूर पोलिसांनी जिल्ह्यात कडेकोट नाकाबंदी करण्याचे नियोजन केले आहे. विशेषत: कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरात शहरांतर्गत नाकाबंदी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
सध्या वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने घालून दिलेल्या नव्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना पोलिस कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.दरम्यान सध्या रात्री नऊ ते पहाटे सहा वाजेपर्यंत जमावबंदी चालू आहे.
त्यामुळे नागरिकांनी 31 डिसेंबर घरात साजरा करण्याचे आवाहन कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केलं आहे.दरम्यान कोल्हापूर जिल्ह्याच्या राज्यबॉर्डर वर नाकाबंदी सुरू आहे.महत्वाची बाब म्हणजे गोवा राज्यातून महाराष्ट्रात येणारी गोव्याच्या दारूची तस्करी रोखण्यासाठी ही विशेष पथके तयार केली आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App