विशेष प्रतिनिधी
मुंबई – ओमिक्रॉनचा वाढता संसर्ग लक्षात घेता पुढील एक महिना मुंबईसाठी परीक्षेचा असणार आहे. त्यामुळे कोविड केंद्रातील तब्बल ३५ हजार २८ खाटा पुन्हा कार्यरत करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यासोबतच मुंबईतील रुग्णालये, जम्बो कोविड केंद्रांसह सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. Omricon increasing fastly in Mumbai
मुंबईत आतापर्यंत ओमिक्रॉनचे ८४ रुग्ण आढळले आहेत; तर कोविड बाधित रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे पालिकेने पुन्हा विलगीकरणावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शाळा, हाॅटेल्स, सभागृह, खासगी संस्थांमध्ये यापूर्वी तयार करण्यात आलेले कोविड काळजी केंद्र पुन्हा टप्प्याटप्याने सुरू करण्यात येणार आहे.
OMICRON CASES IN INDIA TODAY : संसर्गाचा वेग वाढला! ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात; देशातील रुग्णसंख्या १,४३१ वर…
कोविड काळजी केंद्र १ मध्ये बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचे विलगीकरण केले जाते; तर कोविड काळजी केंद्र २ मध्ये लक्षण विरहीत बाधित तसेच सौम्य लक्षणे असलेल्यांचे विलगीकरण केले जाते. सध्या रुग्णालयात दाखल बाधितांची संख्या कमी असल्याने सौम्य लक्षणे असलेल्या बाधितांनाही रुग्णालयात दाखल केले जात होते; मात्र रुग्णांची संख्या वाढू लागल्यास पुन्हा पहिल्या लाटेप्रमाणे नियोजन करण्यात येणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App