OBC reservation : विरोधकांनी आणून दिलेली टोपी मी घातली; तुम्हीही ओबीसींना वाचवायला मदत करा; भुजबळांची टोलेबाजी!!


प्रतिनिधी

मुंबई : विरोधकांनी ओबीसी आरक्षणाची टोपी आणून दिली ती मी लगेच घातली. सुप्रीम कोर्टात आरक्षणाबद्दल काय झाले याचा विचार विनिमय सरकार करते आहे परंतु तुम्ही देखील ओबीसी आरक्षणासाठी सहकार्याचा हात पुढे करा आपण सगळे मिळून आरक्षण वाचवण्याचा प्रयत्न करू ओबीसी शब्द बुडवू नका असे शब्द वाचवा अशी टोलेबाजी राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांना विधानसभेत केली.obc reservation I wore the hat brought by the protesters


OBC reservation : ओबीसी आरक्षण टाळण्यात राजकीय फायदा कोणाचा…?? आणि नुकसान कोणाचे…??


सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणावर काय झाले, यावर आम्ही आता विचारविनीमय करत आहोत. मागील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने १५ दिवसांत अंतरिम अहवाल मागितला होता, त्या घाईत अहवालात त्रुटी राहिल्या असतील, तरीही एकही जिल्हा परिषदेची मुदत संपली नाही, काही महापालिकांनी मुदत संपली आहे, आपण यावर दोन्ही बाजूंनी चर्चा करून सामोपचाराने मार्ग काढूया, विरोधकांनीही सकारात्मकता दाखवावी, अन्यथा ओबीसी ‘वाचावा’ हा शब्द ‘बुडवा’ बनवू नका, अशा शब्दांत मंत्री छगन भुजबळ यांनी हल्लाबोल केला.

आम्हीही विरोधकांना विचारू शकतो

ओबीसींच्या मागे सगळे उभे आहेत, हे चांगले आहे. ओबीसी आरक्षणाची टोपी विरोधकांनी मला टोपी आणून दिली, ती टोपी मी लगेच घातली. न्यायालयाने ओबीसींना आरक्षण नाकारले नाही. मागील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने १५ दिवसांची मुदत दिली होती. त्यासाठी घाईघाईत अहवाल तयार करण्यात आला, त्यामध्ये काही चुका आढळून आल्या असतील, त्यात सुधारणा करू, असे मंत्री भुजबळ म्हणाले. ओबीसींच्या आरक्षणाशिवाय निवडणूक घ्यायच्या नाही, असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला हे चांगले आहे, त्याला विरोधकांनीही पाठिंबा दिला पाहिजे. आम्हीही तुम्हाला प्रति प्रश्न करू शकतो, ओबीसी आरक्षणावर तुम्ही ७ वर्षे का काही केले नाही? कोण आहे हा विकास गवळी? तो का आडकाठी आणत आहे? का तुम्ही इम्पेरिकल डेटा दिला नाही? अशी आम्ही विचारणा करतो का? ओबीसींचे आरक्षण वाचवण्यासाठी सरकार ठाम आहे, असेही छगन भुजबळ म्हणाले.

obc reservation I wore the hat brought by the protesters

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात