हजारोंची गर्दी असलेल्या विवाहसोहळ्यांसह अनेक राजकीय कार्यक्रमांना सार्वजनिक ठिकाणी ही नेतेमंडळी हजेरी लावत होते.Now Dheeraj Deshmukh, MLA of Latur Grameen is infected with corona
विशेष प्रतिनिधी
लातूर : गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील काही मंत्र्यांना आणि आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे.हजारोंची गर्दी असलेल्या विवाहसोहळ्यांसह अनेक राजकीय कार्यक्रमांना सार्वजनिक ठिकाणी ही नेतेमंडळी हजेरी लावत होते.आता या नेत्यांनाच कोरोनाची लागन झाली आहे.अशातच आता लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.
धीरज देशमुख यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. “माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत: ची काळजी घ्यावी. तसेच लक्षणे आढळल्यास कोरोना चाचणी करण्याचे आवाहन देशमुख यांनी केले आहे.डॉक्टरांच्या सल्ल्याने सध्या मी पुढील उपचार घेत आहे.आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे माझी तब्येत चांगली आहे.अस देखील धीरज देशमुख यांनी सांगितले.”
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App