70 % पेक्षा कमी एफआरपी : मुंडे, पाचपुते, थोपटे, काळे यांच्या कारखान्यांना साखर आयुक्तांच्या नोटिसा; 14503.59 लाख रक्कम थकविली


प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांचे सहकारी साखर कारखाने त्यांच्या विधानसभा क्षेत्रात आहेत. काही राजकीय नेत्यांचे साखर कारखाने राज्यात अनेक ठिकाणी आहेत. त्यात यंदा उसाचा गाळप अधिक झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रात यंदाच्या वर्षी सहकारी साखर कारखाने अधिक महिने चालवले आहेत. Notices of sugar commissioner to factories of Munde, Pachpute, Thopete, Kale

काही कारखाने तर एप्रिल महिन्यापर्यंत सुरु होते. हे कारखाने 70 टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी देणारे असून, त्यांनी एकूण 14503.59 लाख आरआरसी रक्कम थकवली असल्याचे साखर आयुक्तांनी जाहीर केले आहे. या साखर कारखान्यांमध्ये धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, बबनराव पाचपुते, कल्याणराव काळे यांच्या कारखान्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.

– या कारखान्यांना आयुक्तांचा दणका

सोलापूर – सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना , पंढरपूर- आरआरसी रक्कम 3674.90 लाख (कल्याणराव काळे)

पुणे- राजगड सहकारी कारखाना लिं.भोर- आरआरसी रक्कम 2591.69 लाख (आमदार संग्राम थोपटे )

बीड- आंबेजोगाई सहकारी कारखाना, आंबेजोगाई, – आरआरसी रक्कम 814.15 (आमदार धनंजय मुंडे)

उस्मानाबाद- जयलक्ष्मी शुगर प्रो. नितळी- आरआरसी रक्कम- 340.69 लाख (विजयकुमार दांडनाईक)

सातारा- किसनवीर ससाका भुईंज, सातारा आरआरसी रक्कम- 411.91 लाख (आमदार मकरंद पाटील)

अहमदनगर- साईकृपा साखर कारखाना, हरिडगाव, अहमदनगर- आरआरसी रक्कम- 2054.50 लाख (आमदार बबनराव पाचपुते)

Notices of sugar commissioner to factories of Munde, Pachpute, Thopete, Kale

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात