सचिन वाझे लादेन नाही? दोघा गुंडांना खोट्या चकमकीत मारण्याचा आखला होता प्लॅन


मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन वाझेची रदबदली करताना तो काय लादेन आहे का? असे विचारले होते. तो लादेन नसला तरी त्याच्यापेक्षा कमी खतरनाक नाही हे दिसून आले आहे. दोघा गुंडांना खोटी चकमक (फेक एन्काऊंटर) घडवून मारण्याचा कट रचलेला होता, अशी धक्कादायक राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) तपासातून समोर आली आहे.Not Sachin Waze Laden? The plan was to kill the two goons in a fake encounter


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन वाझेची रदबदली करताना तो काय लादेन आहे का? असे विचारले होते. तो लादेन नसला तरी त्याच्यापेक्षा कमी खतरनाक नाही हे दिसून आले आहे.

दोघा गुंडांना खोटी चकमक (फेक एन्काऊंटर) घडवून मारण्याचा कट रचलेला होता, अशी धक्कादायक राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) तपासातून समोर आली आहे.एनआयएच्या तपासात सचिन वाझेचे अनेक उद्योग समोर येत आहेत.



उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ सापडलेली स्फोटकांनी भरलेली कार आणि ठाण्याचे व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे. महाविकास आघाडीची वसुली करताना आपली दहशत निर्माण व्हावी यासाठी त्याने एन्काऊंटर मात्र बनावट करण्याचे ठरविले होते.

अंबानी प्रकरणातील गुन्ह्याच्या तपासाचे श्रेय घेण्यासाठी त्यांना जिहादी अतिरेकी भासवून मारायचे होते, मात्र शेवटच्या क्षणी त्याला विचार बदलावा लागला आणि स्वत: रचलेल्या जाळ्यात तो अडकला. एका हायप्रोफाईल गुन्ह्यातील दोघा आरोपींना अतिरेकी भासविण्यासाठी त्याने मोटार, हत्यारे व बुलेटस (जिवंत काडतुसे) जमवली होती. एनआयएने ती जप्त केली.

सचिन वाझे हा या गुन्ह्यात अटक होइपर्यंत क्राईम ब्रँचचा सर्वेसर्वा आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा लाडका होता. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यालाच दर महिन्याला शंभर कोटी रुपयांची वसुली करण्याची जबाबदारी दिली होती, असा आरोप आहे.

तो थेट आयुक्तांना रिपोर्टिंग करत असल्यामुळे एपीआय असूनही तो अन्य वरिष्ठांना जुमानत नसे, त्यामुळे २५ फेब्रुवारीला अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ ३०० मीटर अंतरावर पार्क केलेल्या स्कॉर्पिओमध्ये २० जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र सापडल्यानंतर या प्रकरणाचा तपास गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाकडे (सीआययू) देण्यात आला होता.

भरपूर प्रसिद्धी मिळवण्यासह अंबानी यांच्याकडून मोठी रक्कम उकळण्यासाठी वाझेने हा मोठा कट रचला होता. त्यानुसार या गुन्ह्यात सीआययू तपास करत असलेल्या एका हायप्रोफाईल गुन्ह्यातील दोघांना अटक करुन त्यांना अतिरेकी भासवायचे होते,

त्यांना एका कारमध्ये ठेवून एका निर्जन ठिकाणी न्यायचे, त्यांच्याकडे हत्यारे आणि जिवंत काडतुसे ठेवायची आणि दोघांचा एन्काऊंटर करायचा, असे वाझेने ठरवले होते. त्यासाठी त्याने औरंगाबादमधून इको मोटार, ६२ बुलेट्स मिळवल्या होत्या. ज्याला अतिरेकी भासवायचे होते त्यापैकी एकाचा पासपोर्टही घेतला होता. मात्र, शेवटच्या क्षणी त्याचा प्लान फसला.

वाझेच्या घरातून जप्त केलेल्या ६२ बुलेट्स या बनावट एन्काऊंटरसाठी आणल्या होत्या. ऐनवेळी एन्काऊंटरचा डाव रद्द झाल्याने त्याने हिरेनला थोड्या दिवसांसाठी या गुन्ह्यात अटक होण्यास सांगितले. मात्र, अब्रू जाण्याच्या भीतीने त्याने नकार दिला, त्याच्यामुळे आपले सर्व बिंग फुटेल, असे वाझेला वाटल्याने त्याने ४ मार्चला हिरेनची हत्या केल्याचा संशय अधिकाऱ्यांना आहे.

Not Sachin Waze Laden? The plan was to kill the two goons in a fake encounter

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात