पुणे- सातारा मार्गावरील टोल रद्द होणार नाही. ‘रिलायन्स इन्फ्रामुळे अनेक वर्षांपासून या रस्त्यांची कामे रखडलेली आहेत. ती कामे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएजाय) पन्नास कोटी रुपये खर्च करून पूर्ण करणार आहे.No toll exemption on Pune-Satara route, was Nitin Gadkari’s announcement; The toll will be collected by the government
वृत्तसंस्था
पुणे: पुणे-सातारा महामार्गावरील टोल ‘टर्मिनेट’ करीत असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी ( ता. २४) पुण्यात केली होती. कात्रज उड्डाणपुलाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. मात्र, चोवीस तास होण्याआधीच त्यांची घोषणेला पोकळ ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. या बाबतचे वृत्त ‘लोकमत’ने दिले आहे.
पुणे- सातारा मार्गावरील टोल रद्द होणार नाही. ‘रिलायन्स इन्फ्रामुळे अनेक वर्षांपासून या रस्त्यांची कामे रखडलेली आहेत. ती कामे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएजाय) पन्नास कोटी रुपये खर्च करून पूर्ण करणार आहे.
ही सर्व कामे पूर्ण होईपर्यंत टोल वसुली सरकार करणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर टोल वसुली पुन्हा रिलायन्सकडे दिली जाणार आहे. अशी माहिती महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांनी ‘लोकमत’ला दिली.
शुक्रवारी गडकरी भाषणात म्हणाले होते. गेले अनेक वर्षे पुणे-सातारा मार्ग अडचणीचा झाला होता. अपघातही खूप झाले; पण, आता या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला असून आम्ही रस्त्याचा टोल टर्मिनेट (संपुष्टात) केला आहे. रस्त्याच्या कामांसाठी ५० कोटींचा निधी देणार आहोत. येत्या डिसेंबर किंवा त्यापेक्षा थोड्या अधिक उशिराने रखडलेली कामे पूर्ण करण्यात येतील.
या रस्त्याची कामे अनेक वर्षांपासून रखडली आहेत. अनेक तक्रारी असल्याने व अपघात होत आहेत. त्यामुळे रिलायन्स इन्फ्राकडील टोल वसुलीचे अधिकार सरकार काही दिवसासाठी स्वत:कडे घेणार आहे. या टोल वसुलीच्या पैशातून अपूर्ण कामे पूर्ण केली जातील.
त्यानंतर टोल वसुली पुन्हा रिलायन्स इन्फ्राकडे देण्यात येईल. रस्त्याची कामे सरकार स्वतः पूर्ण करून नंतर टोल वसुली रिलायन्सला का देणार ? यावर चिटणीस म्हणाले की, टोल वसुलीचा अधिकार रिलायन्सचा आहे. आपण केलेल्या कामाचा निधी रिलायन्सला टोल वसुली दिल्यानंतर त्यांच्याकडून वसूल करण्यात येणार आहे.
-सुहास चिटणीस, प्रकल्प संचालक, महामार्ग प्राधिकरण
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App