पुणे आणि गोव्यासाठी नितीन गडकरी आले धावून, ऑक्सिजनचा केला पुरवठा

पुणे आणि गोव्यात ऑक्सिजनची प्रचंड टंचाई निर्माण झाल्यानंतर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी धावून आले. नागपूरहून या दोन्ही ठिकाणी त्यांनी ऑक्सिजनचे टॅँकर पाठविले.Nitin Gadkari rushed to Pune and Goa and supplied oxygen


विशेष प्रतिनिधी

नागपूर : पुणे आणि गोव्यात ऑक्सिजनची प्रचंड टंचाई निर्माण झाल्यानंतर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी धावून आले. नागपूरहून या दोन्ही ठिकाणी त्यांनी ऑक्सिजनचे टॅँकर पाठविले.

दोन ते तीन आठवड्यांपूर्वी नागपुरात ऑक्सिजनची प्रचंड कमतरता होती. यावेळी गडकरी यांनी विविध ठिकाणांहून ऑक्सिजनची व्यवस्था केली. मात्र, कोरोनाबाधितांची संख्या घटत असल्याने ऑक्सिजनची मागणी कमी झाली आहे.दररोज शहरात विविध ठिकाणांहून ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. दुसरीकडे पुण्याला ऑक्सिजनची मागणी वाढली असल्यामुळे नागपुरातून ऑक्सिजनचे चार टँकर पुण्याला पोहोचवण्यात आले.

पुण्यात ऑक्सिजनचा पुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली होती. गडकरीकडे यासंदर्भात विनंती आली असताना त्यांनी तातडीने ऑक्सिजन पाठविण्याचे निर्देश दिले. गोव्यामध्येदेखील ऑक्सिजनची मागणी वाढत आहे.

त्यामुळे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गडकरी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यांच्या मागणीनुसार दररोज एक टँकर ऑक्सिजन गोव्याला पोहोचविण्याची सूचना गडकरींनी दिली आहे.

Nitin Gadkari rushed to Pune and Goa and supplied oxygen

महत्त्वाच्या बातम्या