मुख्यमंत्र्यांच्या शेवटच्या रांगेचे दुःख खरे की राष्ट्रवादीची पोटदुखी “वेगळीच”??


विनायक ढेरे

नीती आयोगाच्या बैठकीच्या वेळी प्रोटोकॉल नुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत केंद्रीय मंत्री आणि सर्व राज्यांचे मुख्यमंत्री यांचा जो फोटो काढला, त्या फोटोमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मागच्या रांगेत उभे होते. हा फोटो सगळीकडे व्हायरल झाला आहे. या फोटोचा आधार घेत प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या विशिष्ट नेत्यांनी शिंदे गटावर शरसंधान साधले आहे. संपूर्ण देशाला सर्वाधिक महसूल देणाऱ्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानांसमवेतच्या फोटोत शेवटच्या रांगेत उभे केले जाते याचे राष्ट्रवादीच्या विशिष्ट नेत्यांना दुःख वाटले आहे!! NITI aayog meeting : photograph with PM Narendra Modi and CM eknath shinde protocol; NCP has different problem

रोहित पवार, जयंत पाटील ट्विट

कर्जत जामखेड चे आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी हे दुःख ट्विटरद्वारे प्रकट केले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील शिंदे गटाला या फोटोवरून टोचून घेतले आहे. मोदींचा दरबार – औरंगजेबाचा दरबार अशी तुलना करत त्यांनी एकनाथ शिंदेंना छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करून दिली आहे. मात्र, त्याच वेळी जयंत पाटलांनी दिल्लीतला प्रोटोकॉल अल्फाबेटिकली असतो असे देखील पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

अल्फाबेटिकली प्रोटोकॉल

मग जयंत पाटील असो अथवा रोहित पवार असो जर दिल्लीतला प्रोटोकॉल अल्फाबेटिकली असेल तर त्यांच्या टीकेला अर्थ काय उरतो?? जे मूळात घडले नाही म्हणजे महाराष्ट्राचा जिथे अपमानच झाला नाही तिथे असली मानभावी किंवा खुसपटी ट्विट करून त्यांना काय मिळाले?? की त्यांचे खरे दुःख वेगळेच आहे??

पवारांची पाचवी रांग

याचा बारकाईने विचार केल्यावर एक बाब स्पष्ट होते, ती म्हणजे 2019 च्या मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी समारंभात राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात शरद पवारांना पाचव्या रांगेत बसवले होते. त्यावेळी मराठी माध्यमांनी पवारांचा अपमान झाल्याची हाकाटी पिटत बातमी केली होती. पण मूळातच शरद पवार हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष असले तरी ते प्रोटोकॉल नुसार फक्त राज्यसभेचे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे अर्थातच पहिल्या रांगेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निमंत्रित केलेले सर्व राष्ट्राध्यक्ष, त्यांच्या समवेत भारतातले विद्यमान सर्वोच्च पदांवर असलेले नेते, माजी पंतप्रधान, माजी राष्ट्रपती, माजी उपराष्ट्रपती, माजी पंतप्रधान बसले होते. त्यानंतरच्या रांगेत सर्व राज्यांचे विद्यमान मुख्यमंत्री बसले होते. त्यातही त्यांना सीनियरिटीप्रमाणे अग्रस्थान असा प्रोटोकॉल असताना शरद पवार यामध्ये कुठेच बसत नव्हते. तरी देखील त्यांना पाचव्या रांगेत स्थान होते ही वस्तुस्थिती आहे. पण मराठी माध्यमांनी मात्र त्यावेळी “शरद पवारांचा अपमान”, अशा बातम्या चालवल्या होत्या.

सीनियॉरीटीनुसार मुख्यमंत्र्यांची रांग

त्याच बातम्यांचा आधार घेऊन एकनाथ शिंदे यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी डिवचले आहे. वास्तविक पाहता जर अल्फाबेटिकली प्रोटोकॉल असेल तर एकनाथ शिंदे हे त्यांच्या आडनावातील “एस” या अक्षरानुसार आपोआपच मागच्या रांगेत येतात. यात मान – अपमानाचा प्रश्न येतो कुठे?? शिवाय फोटो नीट पाहिला तर पहिल्या रांगेत मुख्यमंत्री म्हणून शिवराज सिंग चौहान, ममता बॅनर्जी हे दिसतात. हे आपापल्या राज्यांचे तीन टर्म मुख्यमंत्री राहिलेले आहेत. याचा अर्थ ते सीनियर मोस्ट मुख्यमंत्री ठरतात. एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच मुख्यमंत्री झालेले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सीनियॉरीटीनुसार ते तसेही मागच्याच रांगेत प्रोटोकॉल नुसार उभे राहणे अपेक्षित आहे.

राष्ट्रवादीचे मूलभूत दुःख वेगळे

अशा वेळी अनावश्यक मानापमानाचा विषय काढून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी खुसपटी डाव टाकला आहे. त्यापेक्षाही आता शरद पवारांची जेष्ठता ही ऑफिशियल प्रोटोकॉल मध्ये कुठेच बसत नाही, याचे हे मूलभूत दुःख आहे आणि त्यातूनच जयंत पाटलांसारख्या ज्येष्ठ नेत्याने आणि रोहित पवार यांच्यासारख्या प्रत्यक्षात ज्युनिअर पण उपदेश करण्यामध्ये सीनियर अशा नेत्याने खुसपटी ट्विट करून डिवचण्याचे काम केले आहे… यात बाकी काही नाही!!

NITI aayog meeting : photograph with PM Narendra Modi and CM eknath shinde protocol; NCP has different problem

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती