नवाब मलिक यांनी केलेल्या अनेक आरोपांवर आता भाजप नेते नितेश राणे यांनी मुंबई पत्रकारांशी बोलतांना प्रतिउत्तर दिले आहे.Nitesh Rane: Owners should ask Aditya Thackeray about drug parties at Mumbai’s Four Seasons Hotel
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक मागील काही दिवसांपासून राज्यातील ड्रग्स प्रकरणावरून समीर वानखेडेंवर वारंवार आरोप आणि नवनवीन खुलासे करत आहेत.त्यांनी केलेल्या अनेक आरोपांवर आता भाजप नेते नितेश राणे यांनी मुंबई पत्रकारांशी बोलतांना प्रतिउत्तर दिले आहे.
नितेश राणे यांना पत्रकारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुंबईतील फोर सिझन हॉटेलमध्ये ड्रग्ज पार्ट्या होत असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यावर तुमचं मत काय असा प्रश्न विचारला असता नितेश राणे म्हणाले की ,’फोर सिझन ड्रग्ज पार्टीबद्दल मलिकांनी आदित्य ठाकरेंना विचारावं. तसेच आदित्य ठाकरेंची कसून चौकशी व्हावी अशी मागणीही राणेंनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App