विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईत पुन्हा नाईट लाईफ सुरू झाले असून कोरोना रुग्णसंख्या घटल्याने पालिकेकडून निर्बंधात मोठ्या प्रमाणात सूट दिली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी मोकळा श्वास घेतला आहे. Nightlife resumes in Mumbai; Due to the decrease in the number of corona patients, a large amount of relief has been given by the municipality
मुंबईतील रुग्णसंख्या ही झापट्याने वाढू लागली होती. परंतु काही दिवसांपासून तेथील रुग्णसंख्याही कमी होत आहे. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला २० हजारांवर गेलेला रुग्णसंख्येचा आकडा, आता एक हजारापर्यंत आला. सोमवारी मुंबईत १ हजाराहून कमी रुग्ण आढळले. यापार्श्वभूमीवर निर्बंधात मोठी सूट देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.
मुंबईतील रात्रीची जमावबंदी हटवली आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा नाईट लाईफ सुरु होणार आहे. याशिवाय टुरिस्ट स्पॉट, आठवडी बाजार, समुद्र किनारे, गार्डन, पार्कही सुरु झाल्याने पर्यटकांची गर्दी वाढणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App