NIA Raids : मुंबईत दाऊद इब्राहिमच्या डी गँगच्या 20 अड्ड्यांवर एनआयएचे छापे!!


वृत्तसंस्था

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी गँगवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने अर्थात एनआयए सोमवारी मोठी कारवाई केली आहे. एनआयएने आज, सोमवारी मुंबईतील 20 ठिकाणी छापे घातले आहेत. हे 20 अड्डे दाऊदचे शार्प शूटर, तस्कर, डी गँगचे रिअल इस्टेट मॅनेजर यांच्याशी संबधित असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय अनेक मनी लाँड्रिंग ऑपरेटर्सवरही छापे टाकण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, ज्या प्रकरणात हे छापे टाकण्यात आले ते हेच प्रकरण आहे ज्यात ईडीने राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना अटक करण्यात आली होती.NIA raids on 20 bases of Dawood Ibrahim’s D Gang in Mumbai !!


वसुली प्रकरणात आता डॉन छोटा शकीलची एंट्री, माजी आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरुद्ध सुरू आहे चौकशी


मुंबईतील या 20 अड्ड्यांवर छापेमारी

मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएने बोरिवली, सांताक्रूझ, वांद्रे, नागपाडा, गोरेगाव, परळ येथील 20 ठिकाणी छापे टाकले आहेत. गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, एनआयएने दाऊद इब्राहिम, डी गँगविरोधात गुन्हा दाखल केला होता., त्यासंदर्भात ही चौकशी आणि छापेमारी सुरू आहे. दाऊद इब्राहिमशी संबंधित प्रकरणाचा तपास गृह मंत्रालयाने फेब्रुवारी 2022 मध्ये एनआयएकडे सोपवला होता. राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ही देशातील सर्वात मोठी दहशतवादी तपास संस्था आहे. यापूर्वी ईडी दाऊदशी संबंधित प्रकरणांची चौकशी करत होती.

दाऊदची डी गँग टेरर फंडिंग, नार्को टेरर, ड्रग्स स्मगलिंग आणि फेक करन्सी (एफआयसीएन) मध्ये व्यापार करून भारतात दहशत पसरवण्याचे काम करत आहेत. इतकेच नाही डी गँग लष्कर-ए-तैयबा जैश-ए-मोहम्मद आणि अल कायदाच्या माध्यमातून भारतात दहशतवादी कारवाया करत आहेत.

छोटा शकीलसह अनेकांचा समावेश

एनआयए केवळ दाऊद इब्राहिम आणि त्याच्या डी गँगच्या दहशतवादी कारवायांचा तपास करणार नाही तर अंडरवर्ल्ड डॉनचे गुंड छोटा शकील, जावेद चिकना, टायगर मेनन, इक्बाल मिर्ची (मृत), दाऊदची बहीण हसीना पारकर (मृत) यांच्याशी संबंधित दहशतवादी कारवायांचाही तपास करणार आहे. सध्या दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये लपून बसला असून कराचीच्या पॉश भागात आपले लपण्याचे ठिकाण बदलत असल्याचे सांगितले जात आहे.

NIA raids on 20 bases of Dawood Ibrahim’s D Gang in Mumbai !!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात