प्रतिनिधी
नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाची निवडणूकीसाठी सत्ताधारी भाजप एकीकडे शांतपणे चर्चेच्या फेऱ्या सुरू करत असताना दुसरीकडे पुरेशा मतांची जुळवणी झाली नसलेल्या विरोधकांच्या जोरबैठका सुरू आहेत. त्यातच सर्व विरोधी पक्षांचे मिळून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव एकमताने पुढे आल्याच्या बातम्या आहेत. तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी, महाराष्ट्रातील काँग्रेस अशा तीनही महत्त्वाच्या पक्षांनी शरद पवार यांच्या नावाला दुजोरा दिल्याचे समजते. परंतु, दस्तुरखुद्द शरद पवार यांचे स्वतःच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबाबत नेमके मत काय आहे??, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. पवारांच्या राष्ट्रपतीपदाच्या चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये देखील नेहमीप्रमाणे जोर धरून आहे. News of unanimity of all the opposition in the name of Sharad Pawar
परंतु राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे साठी भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे पारडे जड असताना विरोधकांनी ऐक्य साधून देखील मतांच्या आकडेवारीनुसार यश मिळण्याची शक्यता नसताना स्वतः शरद पवार आपली उमेदवारी स्वीकारून राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या मैदानात उतरतील का??, हा कळीचा प्रश्न आहे.
काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुरुवारी मुंबईत शरद पवारांची भेट घेतली होती. या बैठकीत त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसची त्यांच्या नावाला पसंती असल्याचे संकेत दिले. खर्गेंनी या प्रकरणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्याशीही चर्चा केली आहे. विशेष म्हणजे रविवारी आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनीही पवारांशी दूरध्वनीवरुन संवाद साधला आहे.
शरद पवार यांचे अनेक आघाड्या आणि आघाडी सरकार स्थापन करण्यात महत्वाचे योगदान आहे. विशेषतः शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना एकत्र आणून भाजपला महाराष्ट्राच्या सत्तेतून बेदखल करण्यातही त्यांचे महत्वाचे योगदान होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी महाराष्ट्राचे चाणक्य शरद पवार यांनी दुसऱ्या सर्वच चाणक्यांना धूळ चारल्याचे विधान केले होते. 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने अजित पवारांच्या मदतीने रातोरात सरकार स्थापन केले. पण, पवारांच्या चाणक्यनितीमुळे ते अवघ्या 3 दिवसांतच कोसळले.
15 जून रोजी ममतांनी बोलावली बैठक
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 8 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह विरोधकांच्या 22 नेत्यांना पत्र लिहिले होते. या पत्राद्वारे त्यांनी त्यांना 15 जून रोजी होणाऱ्या एका संयुक्त बैठकीचे निमंत्रण दिले आहे. ही बैठक दिल्लीतील कॉन्स्टीट्युशन क्लबमध्ये होणार आहे.
ममतांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींसह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन, ओडिशाचे सीएम नवीन पटनायक, तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, झारखंडचे सीएम हेमंत सोरेन आणि पंजाबचे सीएम भगवंत मान आदी 22 नेत्यांना पत्र लिहिले आहे.
परंतु ममता बॅनर्जी यांच्या बैठकीला दुसऱ्याच दिवशी डाव्या पक्षाच्या नेत्यांनी खोडा घातला आहे. सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली आधीच बैठक झालेली असताना ममता बॅनर्जी यांनी बैठक बनवण्याचे औचित्य काय आहे?, असा सवाल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी करून ममता बॅनर्जी यांच्या बैठकीवर प्रश्नचिन्ह लावले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App