प्रतिनिधी
पुणे : मनसेप्रमुख राज ठाकरे हे मंगळवारपासून पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांची 21 मे रोजी पुण्यात जाहीर सभा होणार होती. पण ती पावसाच्या कारणामुळे रद्द केल्याची बातमी आली. पण आता ही सभा पुढच्या आठवड्यात होणार असल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. News of the cancellation of the meeting; But there will be a meeting !!; Date to be given tomorrow !!
– गुरुवारी जाहीर करणार तारीख
राज ठाकरे यांची बुधवारी पुण्यातील मनसे पदाधिका-यांसोबत बैठक पार पडली आहे. या तारखेनंतर राज ठाकरे गुरुवारी आपल्या सभेची नवीन तारीख जाहीर करणार असल्याचे मनसेच्या पदाधिका-यांकडून सांगण्यात येत आहे. पण पुढील आठवड्यात ही सभा होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. राज ठाकरे गुरुवारी सकाळी 11.00 च्या सुमारास सभेचे ठिकाण आणि तारीख आणि वेळ जाहीर करणार आहेत. सभेसाठी काही ठिकाणी पोलिसांनी परवानगी दिल्याचेही मनसे नेत्यांनी सांगितले आहे. राज ठाकरे हे मुंबईत पोहोचले.
– राज ठाकरेंचा झंझावात
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मंगळवारपासून पुणे दौ-यावर आहेत. राज ठाकरे यांनी पुण्यात मनसेच्या पदाधिका-यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे यांनी भोंग्यांचा मुद्दा उचलत आपला झंझावात सुरू ठेवला आहे. शिवतीर्थ, ठाणे, संभाजीनगर याठिकाणी राज ठाकरेंच्या जंगी सभा झाल्यानंतर त्यांनी आता सभांचा तडाखा लावल्याचे चित्र दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App