विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे-नाशिक रस्त्यावरील खेड आणि नारायणगाव बायपास रस्त्याच्या उद्घाटनावरून राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि शिवसेनेत श्रेयवादाची लढाई रंगली आहे. मात्र, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ना शरद पवार, ना मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना या रस्त्याचे श्रेय दिले नाही. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळेच रस्त्याचे काम झाल्याचे मान्य करण्याचा मनाचा मोठेपणा डॉ. कोल्हे यांनी दाखविला आहे. Neither Sharad Pawar nor Chief Minister Uddhav Thackeray MP Amol Kolhe gave credit to Nitin Gadkari.
खेड बाह्यवळण रस्त्याचे उद्घाटन व लोकार्पण खासदार डॉ. अमोल कोल्ह यांच्या हस्ते झाले. मात्र कार्यक्रम पत्रिकेत मुख्यमंत्री, माजी खासदार यांचे छायाचित्र व नाव नसल्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्त्य संतप्त झाले होते. यामुळे माजी खासदार आढळराव पाटील यांनी शिवसेना कार्यकर्त्यासह खेड व नारायणगाव रस्त्याचे उद्घाटन केले होते. यावेळी त्यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांच्या टीकेला अमोल कोल्हे यांनी शनिवारच्या कार्यक्रमात उत्तर दिले. कोल्हे म्हणाले, शरद पवार यांचा वरदहस्त डोक्यावर आहे. म्हणून मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे, याचा विचार श्रेयासाठी धडपड करणाऱ्यांनी करावा. माजी खासदाराला काही काम नसल्यामुळे वाद, भांडणे लावण्याचे व श्रेय घेण्याचे काम ते करित आहेत. शरद पवारांमुळेच महाविकास आघाडी सरकार आहे.
कोल्हे म्हणाले, खेड घाटाचे उद्घाटन हे कुठल्याही श्रेयवादाचा भाग नाही. श्रेय द्यायचे असेल तर ते नितीन गडकरी यांनाच द्यायला हवे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांचे आता वय झाल्याने असा अनाधिकृतपणे उद्घाटन करण्याचा पोरकटपणा ते करीत आहे. बैलगाडा, विमानतळ,रेल्वे यावरून टीका करून माजी खासदार श्रेयवादासाठी धडपडत आहे. जुलै २० मध्ये या कामाची वर्क आॅर्डर झाली आहे. त्यानंतर दोन वेळा कामावर समक्ष भेट देऊन अनेक अडचणी दूर केल्या. त्यामुळेच काम लवकर पुर्ण झाले. आढळराव १५ वर्ष खासदार असूनही त्यांना चाकणची वहातूक कोंडी सोडविता आली नाही. बैलगाडा शर्यती, विमानतळ आणि रेल्वे या कामात फक्त आढळराव हे राजकारण करीत आहे.
The Narayangaon, Pune bypass will ease travel between Pune and Nashik. Agricultural products would reach Mumbai-Pune Market easily. #PragatiKaHighway pic.twitter.com/3LMVQZZYkA — Nitin Gadkari (मोदी का परिवार) (@nitin_gadkari) July 16, 2021
The Narayangaon, Pune bypass will ease travel between Pune and Nashik. Agricultural products would reach Mumbai-Pune Market easily. #PragatiKaHighway pic.twitter.com/3LMVQZZYkA
— Nitin Gadkari (मोदी का परिवार) (@nitin_gadkari) July 16, 2021
निष्क्रीय आढळरावांच्या या नौटंकीचा आम्ही जाहीर निषेध करतो. रस्त्यातील अडथळे जेसीबीने काढल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. त्यांचे पोलीस संरक्षण काढावे. आंबेगावात सहकार्य तर खेडला विरोध हे आढळरावांचे दुटप्पी धोरण योग्य नाही, अशी टीका आमदार दिलीप मोहिते यांनी सांगितले
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App