प्रतिनिधी
पुणे – पिंपरी चिंचवडमध्ये शाहू नगरच्या अटल बिहारी वाजयेपी उद्यानाच्या उद्घाटनाला जाताना माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीच्या दिशेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चप्पल फेक करण्याचा प्रकार केला.NCP workers hurled chappal on devendra fadanavis convoy, nitesh rane dares the reverse
या चप्पलफेकीवरून देवेंद्र फडणवीस यांनी असले फालतू कोणी तरी असतात, असे प्रत्युत्तर दिले. मात्र, भाजपचे आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादीला जोरदार इशारा दिला आहे.
पिंपरीत फडणवीसांच्या कार्यक्रमापूर्वीच भाजप – राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घमासान!!
भाजपच्या नेत्यांवर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जर चप्पल फेक करणार असतील, तर भाजपचे कार्यकर्तेही गप्प बसणार नाहीत. राष्ट्रवादीचे नेते महाराष्ट्रात फिरत असतात. ते देखील त्यांना चपलांच्या माळा घातल्याशिवाय राहणार नाहीत. जरा २४ तासांसाठी पोलीसांना सुट्टी द्या मग बघू. आम्ही त्यांना चपलांच्या माळा घालू. त्यांनी चपला मोजत बसाव्यात, असा इशारा नितेश राणे यांनी मुंबईत बोलताना दिला.
-आदित्य ठाकरेंना टोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात मेट्रोचे उद्घाटन केले. देवेंद्र फडणवीसांनी मुंबई आणि पुण्यात मेट्रोचे काम केले होते. पुण्यात भाजपची सत्ता असल्याने मेट्रोचे काम देखील झाले. पण इकडे मुंबईत अजून बेबी पेंग्विन अजून जागाच शोधताहेत. कुठे थंड वाटतेय ते. कांजूरमार्गला गार लागतेय की आरेला गार लागतेय, असा टोला देखील नितेश राणे यांनी लगावला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App