विधानसभा अध्यक्षपदाचा उमेदवार असणार काँग्रेसचा; जास्त बहुमताचा दावा राष्ट्रवादीच्या नबाब मलिकांचा; पण “मधला घटनाक्रम” काय सूचित करतो…??


विशेष प्रतिनिधी

मुंबई – विधानसभेच्या अध्यक्षांच्या निवडीचा विषय आधी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आणि आता राज्यपालांनी पत्र लिहून महाराष्ट्राच्या अजेंड्यावर आणल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी जास्त बहुमताचा दावा करून विधानसभेत निवडणूक जिंकण्याचा दावा केला आहे. NCP leader nawab malik claims “more” majority in maharashtra assembly speaker election

यातली क्रोऩॉल़ॉजी अर्थात घटनाक्रम रंजक आहे.

  • विधानसभेच्या अधिक दिवसांच्या अधिवेशनाला सामोरे जायला ठाकरे – पवार सरकार तयार नाही. त्यामुळे दोनच दिवसांचे अधिवेशन घेण्याचे जाहीर केले. दोनच दिवसांच्या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवडणूक हा विषय अजेंड्यावर घेण्यास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची तयारी नव्हती. पण शरद पवारांनी मंगळवारी सायंकाळी वर्षावर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विधानसभा अध्यक्षांच्या निवडणूकीचा विषय मुख्यमंत्र्यांच्या गळी उतरविल्याचे सांगण्यात येते.
  • आज दुपारी राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी ठाकरे – पवार सरकारला पत्र लिहून विधिमंडळाचे अधिवेशन दोन दिवसांचे नव्हे, तर जास्त दिवसांचे घेण्याची सूचना केली. त्या पत्रातच त्यांनी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेण्याचीही सरकारला सूचना केली.
  • राज्यपालांच्या सूचनेनंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी अध्यक्षांची निवडणूक घेण्याबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले, की आमदारांचे करोना रिपोर्ट आल्यावर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा अंतिम निर्णय होईल परंतु, आम्ही विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बहुमत सिद्ध करताना जी संख्या होती त्यापेक्षा जास्त मतांनी जिंकू, असा दावा त्यांनी केला.
  • विधानसभा उपाध्यक्षांना पत्र लिहून सरकारने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याबाबत सूचवले आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेणे आवश्यक आहे. त्याबाबत तिन्ही पक्षांत एकमत आहे. दोन दिवसाचं अधिवेशन असलं तरी याच अधिवेशनात अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम करता येईल यावर विचारविनिमय सुरू आहे, असेही नवाब मलिक यांनी नमूद केले.
  • विधानसभेचा अध्यक्ष काँग्रेसचा होणे अपेक्षित आहे. मुख्यमंत्री त्यांची निवडणूक घेण्यास उत्सूक नव्हते. शरद पवार आणि राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी तसा आग्रह धरला आहे. आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते जादा बहुमताने काँग्रेसचा विधानसभेचा अध्यक्षपदाचा उमेदवार निवडून येण्याचा दावा करीत आहेत…

… ही क्रोनॉलॉजी अर्थात घटनाक्रम नेमके काय सूचित करते…?? हे पाहणे रंजक ठरणार आहे.

NCP leader nawab malik claims “more” majority in maharashtra assembly speaker election

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात