‘’महाराष्ट्रात भविष्यात दंगली होतील, याचा अर्थ काय घ्यायचा? म्हणजे तुम्ही…’’ फडणवीसांचा आव्हाडांना परखड सवाल!


रामनवमी आणि हनुमान जयंती संदर्भात जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा वाद उफाळण्याची चिन्हं

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड हे कायमच त्यांच्या विविध विधानांमुळे वादाच्या केंद्रस्थानी असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी अशाचप्रकारे एक वादग्रस्त विधान केल्याचं समोर आलं आहे. त्यांच्य या विधानामुळे हिंदू बांधवांच्या विशेषता रामभक्तांच्या भावना दुखावल्याचे दिसून येत आहेत. रामनवमी आणि हनुमान जयंती राज्यात दंगली घडवण्यासाठीच आहे की काय, असं वाटतंय. असं आव्हाड यांनी म्हटलं आहे. ज्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सुनावलं आहे. NCP leader Jitendra Awads controversial statement on Ram Navami and Hanuman Jayanti Deputy Chief Minister Devendra Fadnavis responds

‘’ते विधान अतिशय आक्षेपार्ह आहे. रामभक्तांचा अपमान आहे. समस्त समाजाचा अपमान आहे. अशा प्रकारचे वक्तव्य करणे चुकीचे आहे. महाराष्ट्रात भविष्यात दंगली होतील, याचा अर्थ काय घ्यायचा? म्हणजे तुम्ही असे काही ठरवले आहे का की दंगली घडवायच्या? किमान नेत्यांनी संवेदनशीलतेने वागले पाहिजे.’’ असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ट्वीटद्वारे म्हणाले आहेत.

तर जितेंद्र आव्हाडांच्या या वादग्रस्त विधानावर माध्यमांना प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं की, ‘’खरं म्हणजे हे विधान अतिशय आक्षेपार्ह आहे. मला वाटतं, रामनवमी असेल किंवा हनुमान जयंती असेल अत्यंत शांततेने ती साजरी केली जाते. लोकांच्या मनात प्रभू श्रीरामांच्या प्रती आणि हनुमंतांच्या प्रती प्रचंड श्रद्धा आहे. ती श्रद्धा त्यानिमित्त व्यक्त केली जाते, त्यामुळे दंगलींकरता रामनवमी किंवा हनुमान जयंती साजरी केली जाते असं म्हणणं, हा एकप्रकारे समस्त समाचा अपमान आहे, रामभक्तांचा अपमान आहे.’’

https://youtu.be/ElkUvu6NqLk

याचबरोबर, ‘’मला असं वाटतं की अशाप्रकारचं वक्तव्य करणं हे अतिशय चुकीचं आहे. त्यासोबत महाराष्ट्रात भविष्यात दंगली होतील, असं वक्तव्य करणं… याचा अर्थ नेमका काय घ्यायचा? म्हणजे तुम्ही असं काही ठरवलंय का दंगली घडवायच्या? असा त्याचा अर्थ आहे का? असाही प्रश्न आमच्यासमोर उपस्थित होतो. मला असं वाटतं की किमान नेत्यांनी अशा प्रकरणांमध्ये संवेदनशीलतेने वागलं पाहिजे आणि संवेदनशीलतेने बोललं पाहिजे. सनसनाटी प्रत्येख ठिकाणी निर्माण करणं योग्य नाही.’’ अशा शब्दांत फडणवीसांनी आव्हाडांचा वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले? –

“रामनवमीच्या दिवशी औरंगाबादमध्ये दंगल झाली. त्यानंतर रामनवमी  आणि हनुमान जयंती राज्यात दंगली घडवण्यासाठीच आहे की काय, असं वाटायला लागलं आहे. खरं तर येणारं वर्ष हे जातीय दंगलींचं वर्ष असेल कारण सत्ताधारी देशातील युवकांना नोकऱ्या देऊ शकत नाहीत. महागाई कमी करू शकत नाहीत, त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडे धार्मिक सोहळे करून मत मिळवल्याशिवाय पर्याय नाही”, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

NCP leader Jitendra Awads controversial statement on Ram Navami and Hanuman Jayanti Deputy Chief Minister Devendra Fadnavis responds

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात