याप्रकरणी एनसीबी अधिकाऱ्यावर परळी येथील जीआरपी पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३५४, ५०९ अन्वये गुन्हा दाखल करण्याची आला आहे.NCB officer molested student on train, arrested by police
विशेष प्रतिनिधी
बीड : उदगीर -लातूर रोड दरम्यान एका विद्यार्थिनीची छेडछाड करण्यात आल्याचा प्रकार हैदराबाद -हडपसर रेल्वे गाडी मध्ये गुरुवारी रात्री घडला . याप्रकरणी विद्यार्थिनीने एका व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.त्यानंतर त्या व्यक्तीला अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेली व्यक्ती ही एनसीबीचा (अंमली पदार्थ नियंत्रण विभाग ) मुंबई येथील अधिकारी असल्याची धक्कादायक माहिती समोर आहे.
एनसीबीचा अधीक्षक असलेल्या दिनेश अंकुश चव्हाण या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. दिनेश चव्हाण यांनी उदगीर -लातूर रोड दरम्यान एका विद्यार्थिनीची छेडछाड काढली.याप्रकरणी त्यांच्यावर परळी येथील जीआरपी पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३५४, ५०९ अन्वये गुन्हा दाखल करण्याची आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री एनसीबी अधिकारी आणि आणि विद्यार्थिनी हैद्राबाद- हडपसर या रेल्वेने प्रवास करत होते.यादरम्यान एनसीबी अधिकाऱ्याने विद्यार्थिनीची छेड काढली.त्यानंतर विद्यार्थिनीने एनसीबी अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीला परळी रेल्वेच्या जीआरपी पोलिसांनी ताब्यात घेतले.आज आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App