नवाब मलिक हे एनसीबीच्या विरोधात पुराव्यानिशी बोलत असून हे प्रकरण नागरिकांना छळण्यासाठी, बदनाम करण्यासाठी व नागरिकांना अनेक दिवस तुरुंगात ठेवण्यासाठी एनसीबीचा वापर होतोय, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दापोली येथे पत्रकार परिषदेत केला.Nawabbhai is telling the truth, using central machinery to harass citizens says Jayant Patil
प्रतिनिधी
दापोली : नवाब मलिक हे एनसीबीच्या विरोधात पुराव्यानिशी बोलत असून हे प्रकरण नागरिकांना छळण्यासाठी, बदनाम करण्यासाठी व नागरिकांना अनेक दिवस तुरुंगात ठेवण्यासाठी एनसीबीचा वापर होतोय, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दापोली येथे पत्रकार परिषदेत केला.
शाहरुख खानच्या मुलाच्या बाबतीत घडलंय आणखी इतरांच्या बाबतीतही झालं असेल त्यामुळे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली.
श्री. @nawabmalikncp हे एनसीबीबाबत सत्य लोकांसमोर मांडत आहेत. केंद्रीय यंत्रणा गैरप्रकार करुन लोकांची दिशाभूल करत आहेत. एनसीबी, आयटी, ईडी अशा केंद्रीय यंत्रणांचा वापर नागरिकांना छळण्यासाठी, बदनाम करण्यासाठी आणि अनेक दिवस तुरुंगात ठेवण्यासाठी केला जात आहे – ना, @Jayant_R_Patil pic.twitter.com/COCYjWszdt — Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) October 28, 2021
श्री. @nawabmalikncp हे एनसीबीबाबत सत्य लोकांसमोर मांडत आहेत. केंद्रीय यंत्रणा गैरप्रकार करुन लोकांची दिशाभूल करत आहेत. एनसीबी, आयटी, ईडी अशा केंद्रीय यंत्रणांचा वापर नागरिकांना छळण्यासाठी, बदनाम करण्यासाठी आणि अनेक दिवस तुरुंगात ठेवण्यासाठी केला जात आहे – ना, @Jayant_R_Patil pic.twitter.com/COCYjWszdt
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) October 28, 2021
एनसीबीची टीम वानखेडेच्या चौकशीसाठी आलीय. वानखेडेची चौकशी करतेय. वानखेडे याने घेतलेला दाखला व IRSमध्ये जो प्रवेश घेतला, तो कोणत्या जातीच्या आधारावर घेतला याचं गणित लवकरच कळेल आणि फसवणूक कुणी केली व कशी केली याचा खुलासादेखील लवकरच होईल. चौकशीसाठी आलेली एनसीबीची टीम खऱ्या गोष्टींची चौकशी करेल. त्यामुळे ही टीम चुकांवर पांघरूण घालण्यासाठी आली नसावी, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.
नवाब मलिक हे सत्य गोष्टी समोर आणत आहेत त्या सत्य आहेत. केंद्राच्या या यंत्रणा चुका करून दिशाभूल करत आहेत. या यंत्रणांचा वापर करून नागरिकांना छळण्याचा प्रकार होतोय, असेही जयंत पाटील म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App