क्रूझ ड्रग्ज प्रकरणी मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये बंद असलेल्या आर्यन खानच्या जामिनावर आज निर्णय होऊ शकतो. मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी दुपारी ३ वाजता याप्रकरणी सुनावणी होणार आहे. आरोपींच्या जामिनाला विरोध करताना अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (एएसजी) अनिल सिंग एनसीबीच्या वतीने युक्तिवाद करतील. बुधवारी न्यायालयाने सांगितले होते की, जर एएसजीने एका तासात युक्तिवाद पूर्ण केला तर गुरुवारीच याप्रकरणी निर्णय घेतला जाईल. Aryan Khan Drugs Case If NCB argument is completed soon, decision on Aryan’s bail may come today in Bombay HC
प्रतिनिधी
मुंबई : क्रूझ ड्रग्ज प्रकरणी मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये बंद असलेल्या आर्यन खानच्या जामिनावर आज निर्णय होऊ शकतो. मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी दुपारी ३ वाजता याप्रकरणी सुनावणी होणार आहे. आरोपींच्या जामिनाला विरोध करताना अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (एएसजी) अनिल सिंग एनसीबीच्या वतीने युक्तिवाद करतील. बुधवारी न्यायालयाने सांगितले होते की, जर एएसजीने एका तासात युक्तिवाद पूर्ण केला तर गुरुवारीच याप्रकरणी निर्णय घेतला जाईल.
यापूर्वी दोन दिवस चाललेल्या सुनावणीदरम्यान आर्यन खान, त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमिचा यांच्या वकिलांनी आपली बाजू मांडली होती. सुनावणीदरम्यान आर्यन खानचे वकील मुकुल रोहतगी यांनी कोर्टात सांगितले की, आर्यन खानच्या कोठडीचे कोणतेही कारण दिलेले नाही. यासोबतच आर्यनकडून कोणतीही ड्रग्ज रिकव्हरी झालेली नाही, त्यामुळे त्याची अटक पूर्णपणे चुकीची आहे. मंगळवारी झालेल्या युक्तिवादादरम्यान, माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद केला होता की, आर्यन खानचे वय कमी असल्याने त्याला जेलऐवजी सुधारगृहात पाठवले पाहिजे.
शुक्रवारपर्यंत निर्णय होण्याची शक्यता
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकार्यांनी क्रूझ शिप पार्टीत छापा टाकल्यानंतर 23 वर्षीय आर्यनला 3 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. सध्या आर्यन हा आणखी एक आरोपी अरबाज मर्चंटसोबत आर्थर रोड जेलमध्ये बंद आहे. तर मुनमुन धमीचा भायखळा महिला कारागृहात आहे. तज्ज्ञांच्या मते, न्यायाधीशांनी वेळेच्या कमतरतेचा हवाला देत किंवा सादर केलेले पुरावे आणि इतर कागदपत्रे वाचण्यासाठी वेळ घेतला तर या प्रकरणातील निर्णय राखून ठेवला जाऊ शकतो. आता असे झाले तर आर्यनच्या जामिनावर शुक्रवारी निर्णय येऊ शकतो.
जामीन न मिळाल्यास आर्यन 15 नोव्हेंबरपर्यंत तुरुंगात
आर्यन खान 30 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहे. त्याला जामीन न मिळाल्यास त्याची न्यायालयीन कोठडी वाढवण्यात येणार आहे. 30 आणि 31 ऑक्टोबर रोजी न्यायालयाला शनिवार-रविवार सुट्टी आहे. यानंतर १ नोव्हेंबरपासून दिवाळीच्या सुट्या सुरू होत आहेत. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालय 12 नोव्हेंबरपर्यंत बंद राहण्याची शक्यता आहे. 13 आणि 14 नोव्हेंबर रोजी न्यायालयाला पुन्हा शनिवार-रविवार सुट्टी असेल. अशा प्रकारे कोर्टात पुढील सुनावणी 15 नोव्हेंबरपर्यंत होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App