प्रतिनिधी
मुंबई : मुंबई – गोवा क्रूज वरील ड्रग्ज रेव्ह पार्टी संदर्भात बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यांच्यासह आठ जणांना अटक करणारे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे वरिष्ठ अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस भलतीच खार खाऊन आहे. Nawab Malik’s serious allegations against Sameer Wankhede
राष्ट्रवादीचे मंत्री आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर नवीन आरोप केला आहे. समीर वानखेडे यांनी आपण जनतेचे सेवक असल्याचे म्हटले आहे. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना नबाब मलिक यांनी वानखेडे हे सचिन वाझे आणि परमवीर सिंग यांच्याच कॅटॅगरीतली अधिकारी आहेत. मी एक एक गौप्यस्फोट करणार आहे. त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून मुंबई – गोवा क्रूज वरील भाजपच्या नेत्याला सोडून दिले?, याचा खुलासा लवकरच करणार आहे. समीर वानखेडे भाजपच्या कोण कोणत्या नेत्यांशी संपर्कात होते?, असे सवाल नबाब मलिक यांनी उपस्थित केले आहेत.
सचिन वाझे आणि परमवीर सिंग हे पोलीस अधिकारी देखील आपण जनतेचे सेवक असल्याचे सांगत होते. परंतु या दोन्ही पोलिस अधिकाऱ्यांचे “उद्योग” आता जनतेसमोर आले आहेत. या पैकी एक गजाआड आहे, तर दुसरा फरार आहे अशा शब्दांत नबाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसने ज्यावेळी आर्यन खानच्या अटकेवर आक्षेप घेतला, त्यावेळी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर पांडे यांनी हवे तर राष्ट्रवादीने न्यायालयात जावे. आम्ही त्यांना तिथे प्रत्युत्तर देऊ असे आव्हान दिले होते. परंतु, नबाब मलिक आणि राष्ट्रवादीने न्यायालयाचा मार्ग न स्वीकारता समीर वानखेडे यांना टार्गेटवर घेतले आहे. त्यातूनच नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर ते सचिन वाजे आणि परमवीर सिंग यांच्या कॅटेगिरीतले अधिकारी असल्याचा आरोप केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App