Nawab Malik ED : दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरने नाव घेतल्यानंतर नवाब मालिकांची ईडी चौकशी!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : अंडरवर्ल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कुख्यात तस्कर दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याने नवाब मलिक यांचे नाव घेतल्यानंतर त्यांची सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने ही चौकशी सुरू केल्याची माहिती आहे. Nawab Malik ED: After the name of Dawood’s brother Iqbal Kaskar, Nawab series ED inquiry !!

ईडीने इक्बाल कासकर याला तीनच दिवसांपूर्वी ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली होती. या चौकशीत त्याने ज्या राजकीय नेत्याचे नाव घेतले ते नवाब मलिक यांचे निघाले. त्यानंतर ईडीचे अधिकारी आज सकाळी 5.30 च्या सुमारास नवाब मलिक यांच्या घरी पोहोचले. तेथे त्यांनी काही पाहणी केली

नवाब मलिक यांनी ईडीच्या अधिकार्‍यांसमवेत ईडीच्या कार्यालयात येण्याचे मान्य केले आणि सुमारे 7.45 वाजता अधिकार्‍यांसमवेत नवाब मलिक ईडी कार्यालयात यायला निघाले. त्यानंतर त्यांची चौकशी सुरू असून कोणत्या प्रकारे मनी लॉन्ड्रिंग झाले?, त्याचा काय वापर झाला? याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.



2019 नंतर डिजिटलचे वॉलेट आणि डार्कनेटचा वापर करून मनी लॉन्ड्रिंग झाले. पैशाची अफरातफर करण्यात आली. हा पैसा मुंबईच्या रियल इस्टेटमध्ये गुंतविण्यात आला. याचा नवाब मलिक यांच्याशी संबंध आहे. या विषयीची तपशीलवार चौकशी ईडीचे अधिकारी करत आहेत. मुंबईतले दोन बडे बिल्डर देखील याबाबत ईडीच्या स्कॅनर खाली आहेत.

केंद्रीय गृहमंत्रालयाने काही दिवसांपूर्वी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा छडा लावण्यासाठी काढलेल्या आदेशानुसार या चौकशा सुरू झाले आहेत. या चौकशांना वेग आला आहे त्यावेळी महाराष्ट्रातल्या बड्या राजकीय नेत्याचे दाऊदशी संबंधांविषयी चर्चा झाली होती. त्यापैकी नवाब मलिक हे एक नाव होते. ते आज ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात आले आहेत. कारण त्यांचे नाव स्वतः इक्बाल कास कासकरने घेतल्याचे ईडीच्या सूत्रांनी सांगितले आहे.

Nawab Malik ED: After the name of Dawood’s brother Iqbal Kaskar, Nawab series ED inquiry !!

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात