नवनीत राणांच्या जीवाला धोका?; पत्र पाठवत सावधानतेचा दिला सल्ला

प्रतिनिधी

अमरावती : खासदार नवनीत राणा यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती समोर आली आहे. राणा यांचा हितचिंतक असल्याचे सांगत त्यांना एका पत्राद्वारे ही माहिती दिली आहे. काही संशयास्पद लोक राजस्थानच्या सीमेवरून अमरावतीत आले आहेत. ते तुमच्या घरी देखील येऊन गेले, त्यामुळे तुमच्या सुखरुपतेची मी प्रार्थना करतो. तुम्हाला काहीही होऊ नये, असे त्याने पत्रात म्हटले आहे. Navneet Rana’s life is in danger

राणा दाम्पत्य हनुमान चालिसावरुन चर्चेत आलं होतं. पण आता मात्र आता खासदार नवनीत राणा त्यांच्या जीवाला धोका असल्याचे पत्र आल्याने, अमरावतीत खळबळ माजली आहे.– काय लिहिलंय पत्रात?

नमस्ते मॅडम, मै आपको मेरा नाम नही बता सकता हुं. मै आपके ही शहर का एक आम नागरिक हुं. मै आपको आगाह करना चाहता हुं की, आप थोडा संभलकर रहीये, क्योंकी कुछ लोग आपका पिछा कर रहे है. आपने मेरे बहोत काम में हेल्प की है. मै एक गव्हर्मेंट सर्वंट हुं. आपने मेरा ट्रान्सफर कर दिया था और मेरे फादर की कोरोना में बहोत हेल्प की है. मै आपको यही बताना चाहता हुं, की कुछ संदिग्ध लोग राजस्थान बाॅर्डर से अमरावती आये है. और मुझे यह जानकारी मिली है की वह लोग आपके घर भी आकर गये है. मै दुआ करता हुं की आपे के साथ कुछ भी अनहोनी ना हो. और आप इसि तरह बडे से बडे पद पर जाये, ऐसी दुवा करता हुं. खुदा हाफीस….अशा आशयाचे ते पत्र आहे.

Navneet Rana’s life is in danger

महत्वाच्या बातम्या