विशेष प्रतिनिधी
नाशिकः नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात तब्बल 240 कोटींचे घबाड सापडले आहे. 6 कोटींची रोकड, 5 कोटींचे दागिने यावेळी जप्त करण्यात आले. एखाद्या सिनेमात दाखवतात अगदी तसेच घडले आहे उत्तर महाराष्ट्रातात. NASHIK IT RAID: Rs 240 crore scam! Raids in Nashik Dhule-Nandurbar; 175 officers – a convoy of 22 vehicles – precious diamonds – gold biscuits;
उत्तर महाराष्ट्रातील विशेषतः नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये 32 ठिकाणी जमीन खरेदी-विक्री करणारे व्यावसायिक, सरकारी कंत्राटदार, कंत्राटादारांशी संबंधित बिल्डर्स यांच्या निवासस्थानावर हे छापे टाकण्यात आले.
बुधवारी, 22 डिसेंबर रोजी पहाटे सुरू झालेली ही कारवाई सुमारे पाच दिवस चालल्याचे समजते. मात्र, याची कुणकुणही कोणाला लागू देण्यात आली नाही. या कारवाईत एकूण 240 कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड झाली. एकाचवेळी नंदुबारसह इतर ठिकाणच्या बिल्डरची कार्यालये, घरे, भागीदारांचे निवासस्थान, नातेवाईक यांच्या घरी हे छापे टाकण्यात आले.
नाशिकमध्ये शहरातील अतिशय उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कॉलेज रोडवरील डिसुझा कॉलनीत आयकर विभागाने छापे टाकले. या कॉलनीतील व्यावसायिकांची घरे आणि त्यांच्या कार्यालयाची झडती घेण्यात आली.
विशेषतः देवळाली कॅम्प आणि भगूर येथील कार्यालयातही कित्येकांचे घबाड सापडल्याचे समजते. या संबंधित व्यावसायिकांच्या नातेवाईकांचीही चौकशी करण्यात आल्याचे समोर आले आहे. इतक्या मध्यवस्तीत कारवाई होऊनही याचा थांगपत्ता कुणाला लागू देण्यात आला नाही.
उत्तर महाराष्ट्रातील ही बडी कारवाई करण्यासाठी 175 अधिकारी एकाचवेळी वेगवेगळ्या मार्गाने संबंधित ठिकाणांवर पोहचले. त्यांच्या दिमतीला एकूण 22 गाड्यांचा ताफा आणि तगडा पोलीस बंदोबस्त होता. या कामासाठी नागपूर, पुणे, ठाणे, कल्याण येथील अधिकाऱ्यांचीही मदत घेण्यात आली.
आयकर विभागाला यावेळी पाच कोटींचे दागिने सापडले. त्यात अतिशय मौल्यवान हिरे, सोन्याची बिस्कीटे, मोत्याची दागिने अशी मोठी जडजवाहिरे सापडली. अनेकांनी बऱ्याच ठिकाणी दुसऱ्याच्या नावावर व्यवहार केल्याचे आढळले. कित्येकांचा नातेवाईकांच्या घरी पैसा होता. तर कित्येकांनी दुसऱ्याच्या नावावर खरेदी-विक्रीचे व्यवहार केल्याचेही समोर आले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App