राज्यावरील संकटे मुख्यमंत्र्यांचा पायगुण, पाय पाहायला पाहिजे, पांढरे आहेत का्य नारायण राणे यांची उध्दव ठाकरेंवर टीका

विशेष प्रतिनिधी

चिपळूण : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून आल्यापासून राज्यावर एकामागून एक संकटे येत आहेत. राज्यावरील येणारी ही संकटे मुख्यमंत्र्यांचा पायगुण आहे. कोरोना ही मुख्यमंत्र्यांचीच देण आहे.Narayan Rane’s criticism of Uddhav Thackeray

मुख्यमंत्री आले कोरोना घेऊनच आले. पाय पाहायला पाहिजे, पांढरे पाय आहेत का? असा हल्लाबोल केंद्रीय लघू उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केला आहे.



रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात असलेल्या तळीये गावावर दरड कोसळली. राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी चिपळूणच्या बाजारपेठेत जाऊन पाहणी केली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन राणे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोलत केला.

राणे म्हणाले , पाठांतर करून यायचे आणि लोकांमध्ये जाऊन बोलायचे. या राज्यामध्ये मुख्यमंत्री नाही, प्रशासन नाही, अशी भयावह परिस्थिती सध्या येथे आहे. गेल्या चार दिवसांपासून लोक हे अधिकाºयांना जाब विचारत होते. काही कल्पना दिली नाही.

लोकांना धोका लक्षात घेऊन स्थलांतरीत करायला हवे होते. त्यांची जेवणाची व्यवस्था करायला हवी होती. हे सर्व सरकारकडून केले गेले पाहिजे होते. सरकारने काहीच केलेले नाही. या सर्वांना जबाबदार हे प्रशासन आहे.

Narayan Rane’s criticism of Uddhav Thackeray

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात