Narayan rane press : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नुकतीच त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. महाड कोर्टाने जामीन दिल्यानंतर राणेंनी आज पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून काही सवाल उपस्थित केले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच सेनाभवनाबद्दल बोलताना वापरेले शब्द असंसदीय नव्हते का? असे प्रश्न राणे यांनी केले आहेत. Narayan rane press conference after controversial statement about uddhav thackeray
विशेष प्रतिनिधी
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नुकतीच त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. महाड कोर्टाने जामीन दिल्यानंतर राणेंनी आज पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून काही सवाल उपस्थित केले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच सेनाभवनाबद्दल बोलताना वापरेले शब्द असंसदीय नव्हते का? असे प्रश्न राणे यांनी केले आहेत.
केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, काल मी रत्नागिरीतून महाड कोर्टात जाऊन पहाटे पाच वाजता मुंबईत पोहोचलो. महाड आणि मुंबई हायकोर्टात माझ्या बाजूनं निकाल लागला. याचाच अर्थ देशात कायद्याचं राज्य आहे. 17 सप्टेंबरपर्यंत कायदेशीर प्रक्रिया असल्यानं त्यासंदर्भात बोलणार नाही. पत्रकारांना त्रास होऊ नये म्हणून पत्रकार परिषदेचे आयोजन केलं आहे. गेले काही दिवस जनआशीर्वाद यात्रा सुरु असताना जे काही टीव्हीवर येत होतं त्याची सगळी माहिती मला मिळत होती. काही जण माझ्या चांगुलपणाचा, मैत्रीचा फायदा उठवतात हे माझ्या लक्षात आलं आहे. त्यासंदर्भातही काही बोलणार नाही.
राणे पुढे म्हणाले की, आमची यात्रा ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान होऊन सात वर्ष झाली. या सात वर्षात त्यांनी केलेलं काम सर्वसामान्यांपर्यंत, शेवटच्या टोकापर्यंत पोहोचावं हे सांगण्यासाठी होती. दुसरं म्हणजे देशाच्या मंत्रिमंडळात मला कॅबिनेट मंत्री म्हणून घेतलं. राज्यातील आणि देशातील अनेक खासदारांना मंत्री बनवण्यात आलं. त्यांना मोदींनी सर्वांना आपापल्या राज्यात जनतेचं आशीर्वाद मागण्यास सांगितलं. तसंच तुमच्या खात्याला सुरुवात करण्यास सांगितलं. त्यानुसार आम्ही १९ तारखेपासून जनआशीर्वाद सुरु केली. मी कालपर्यंत यात्रेत होतो. दोन दिवस गॅप ठेवलाय. परवापासून यात्रा सुरू होईल. यात कोणताही गॅप पडणार नाही.
केंद्रीय मंत्री श्री. नारायण राणे यांची पत्रकार परिषद. https://t.co/HJb0J8Uc2C — भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) August 25, 2021
केंद्रीय मंत्री श्री. नारायण राणे यांची पत्रकार परिषद. https://t.co/HJb0J8Uc2C
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) August 25, 2021
या सर्व लढ्यात आमच्या विरोधी मित्राने लढा सुरू केला. त्यामध्ये माझा पक्ष माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला. त्यामुळे मी जेपी नड्डा, चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस तसेच सर्व कार्यकर्त्यांचा आभारी आहे. मी असं काय बोललो होतो त्याचा राग आला? ते वाक्य मी परत बोलणार नाही. भूतकाळात एखादी घटना घडली आणि कसा क्राईम होतो? काय पत्रकारिता आहे? आम्ही पाहिलीच नाही. आक्षेप नाही. शिवसेनेच्या नेत्यांनी असे शब्द उच्चारले नाहीत का? असा सवालही त्यांनी केला.
केंद्रीय मंत्री राणे पुढे म्हणाले की, १ ऑगस्टला बीडीडी चाळीचं पूलबांधणीचा कार्यक्रम होता. त्याअगोदर आमचे आमदार प्रसाद लाड यांनी सेना-भवनबद्दल काहीतरी वक्तव्य केलं होतं. आमच्या महिलांवर हात टाकला तर, असं ते बोलले होते. मी जे बोललो होतो त्यात आपल्या देशाला अभिमान नसेल त्याला राष्ट्रीय सण माहीत नसतात. देशाबद्दल अभिमान आहे. त्यामुळे मला सहन झालं नाही. त्यामुळे मी ते बोललो. ते महाशय काय बोलले, म्हणजे मुख्यमंत्री, सेना भवनाबद्दल असं कोणी भाषा करेल तर त्याचं थोबाड तोडा, आदेश दिले. हा क्राईम नाही? 120 बी होत नाही? पत्रकारांनी मला शिकवावं. नाहीतर मी वकीलच डाव्या बाजूला घेऊन बसलो आहे. त्यांचं दुसरं एक वाक्य आहे, योगी साहेबांबद्दल. हा योगी आहे का ढोंगी? चपलेने मारलं पाहिजे. एका मुख्यमंत्र्याला म्हणतात चपलेने मारलं पाहिजे. तिसरा प्रश्न अमित शाह यांच्याबद्दल, मी आणि अमित शाह यांनी बसून ज्या काही पुढच्या वाटचालीबद्दल आखणी केली होती आता मी निर्लज्जपणाने हा शब्द मुद्दाम वापरतो. हा अनपार्लीमेंट शब्द नाही? आपले आधी तपासले पाहिजे. याच्यात तो गाळलेला शब्द आहे. काय हो माननीय पवार साहेब? काय सज्जनपणा आहे. एवढं चांगलं बोलणाऱ्याला त्यांनी मुख्यमंत्री केलं ते चुकीचं केलं असं मला वाटत नाही. काय भाषा आहे. राष्ट्राबद्दल अज्ञान दाखवलं म्हणून आम्ही बोललो होतो.
राणे पुढे म्हणाले की, त्यांना आंदोलन करायचे करू द्या, आम्ही तिघेही मुंबईत नव्हतो, घरासमोर आंदोलन केलं, पोलिसांनी करायचं ते केलं. तुम्ही कोणीच माझं काही करू शकत नाही. तुम्हाला सगळ्यांना मी पुरून उरलोय. शिवसेना वाढली त्यात माझा मोठा सहभाग आहे. तेव्हा आताचे कोणी नव्हते. म्हणून त्यांना आंदोलन करायचं करू दे, आमचा बंदोबस्त करायचा करू दे, पोलिसांनी पाहत राहावं. तुम्ही सर्वांनी अनिल परबची कॅसेटची पाहिली असेल. अरे काय डाका घातला? पोलिसांना आदेश देतात. राज्यात कायदा सुव्यवस्था आहे कुठे? बलात्कार होतात, हत्या होतात आरोपी मोकाट आहेत? दिशा सॅलियनचं कोणी केलं, कोण मंत्री उपस्थित होता का त्याचा छडा लागत नाही. आणि एक महिला पूजा सावंत तिच्यावर पण तेच. त्या मंत्र्याला आणि त्याला अटक होईपर्यंत आम्ही लोकशाही मार्गाने पाठलाग करणार, कोर्टात जाणार. आम्ही कायदेशीर लढाई लढणार, त्यात जे जे होते ते आत जाईपर्यंत गप्प बसणार नाही.
Narayan rane press conference after controversial statement about uddhav thackeray
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App