बाळासाहेब यांच्यावरील प्रेम इतकं होत की गावाकडे आल्यानंतरही त्यांनी शिवसेनेचे काम चालू ठेवले.Nanded: A temple of Balasaheb Thackeray was erected in Itagyal village
विशेष प्रतिनिधी
नांदेड : नांदेडमध्ये जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील इटग्याळ या गावात एका शिवसैनिकाने दोन एकर जमीन विकून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मंदिराची स्थापना केली आहे.या मंदिराची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे.
अल्पभूधारक शेतकरी संजय इटग्याळकर या शेतकऱ्यांने हे मंदिर उभारले आहे.संजय इटग्याळकर यांना अगदी लहानपणापासूनच बाळासाहेब ठाकरे यांचे प्रखर हिंदुत्व, मराठी माणूस व हिंदुत्व यासाठीचा त्यांचा लढा याविषयी नेहमीच आकर्षण होते.
बी.ए पर्यंत शिक्षण घेतले.इथेच न थांबता त्यांनी उदरनिर्वाहासाठी व बाळासाहेबांच्या सानिध्यात राहता यावे तसेच त्यांना जवळून अनुभवता यावे असाठी त्यांनी सन 2000 मध्ये थेट मुंबई गाठली. मुंबईत पोहचल्यानंतर त्यांनी उदरनिर्वाहासाठी अंधेरी स्थित जानकी देवी पब्लिक स्कूल येथे मुलांना कराटे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.तसेच एक शिवसैनिक म्हणून शिवसेनेत काम सुरू केले.
परंतु घरची आर्थिक परिस्थिती व कुटुंबाच्या जबाबदारीमुळे त्यांना पुन्हा गावाकडे परतावे लागले. बाळासाहेब यांच्यावरील प्रेम इतकं होत की गावाकडे आल्यानंतरही त्यांनी शिवसेनेचे काम चालू ठेवले. एवढेच नाही तर दरवर्षी न चुकता ते आतापर्यंत दसरा मेळाव्यास आपली हजेरी लावतात.
बाळासाहेबांच्या निधनानंतर बाळासाहेबांचे विचार व त्यांचा सामान्यविषयीचा लढा, त्यांची हिंदुत्वाविषयीची जागरुकता ही तरुण पिढीपर्यंत पोहोचावी यासाठी 2013 साली संजयने आपल्या वडिलोपार्जित जागेत बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारला.
ऊन, वारा, पाऊस या नैसर्गिक आपत्तीमुळे पुतळ्याचे नुकसान होऊ नये यासाठी त्याच जागेवर संजयने बाळासाहेबांचे मंदिर उभारले आहे.मंदिर उभारण्यासाठी पैशांची कमतरता जाणवल्याने संजय यांनी वडिलोपार्जित 2 एकर जमिनीची विक्री विकली आणि तब्बल 14 लाख रुपये खर्च करुन बाळासाहेबांचे सुंदर व सुबक असे मंदिर संजयने उभारले आहे. कमीत कमी एक एकर जागेत संजय इटग्याळकर यांनी हे मंदिर उभारले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App