मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री माझ्यावर पाळत ठेवतात; नाना पटोलेंचे लोणावळ्यातले भाषण पुन्हा चर्चेत


प्रतिनिधी

पुणे – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लोणावळ्यात काँग्रेसच्या मेळाव्यात केलेले भाषण पुन्हा चर्चेत आले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री मला सुखाने जगू देणार नाहीत. ते माझ्यावर पाळत ठेवतात, हे नानांनी केलेले वक्तव्य सध्या सोशल मीडियावर जोरदार चालविण्यात येत आहे. Nana patole hits on social media again; claimed he is being espinoged by CM and Dy CM

नानांचे लोणावळ्यातले भाषण भलतेच गाजले कारण त्यांनी भाजपवर प्रखर हल्ला चढविण्याऐवजी शिवसेना – राष्ट्रवादीवरच प्रखर हल्ला चढविला. पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवारांवर केला. पण त्यावर शरद पवारांनी देखील नानांसारख्या लहान माणसांवर मी बोलत नाही, असे सांगून प्रतिक्रिया दिली. नानांचे हेच भाषण शिवसेना आणि राष्ट्रवादीला टोचले आहे.



नाना म्हणाले होते की, “महाराष्ट्रात काँग्रेस पुन्हा उभी राहात असल्याचे त्यांना माहिती आहे. आयबीचा रिपोर्ट रोज मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सकाळी ९ वाजता त्यांच्या घरी नेऊन द्यावा लागतो. कुठे बैठका, आंदोलन सुरू आहे, काय परिस्थिती आहे याची माहिती द्यावी लागते. मी इथे आहे याचीही रिपोर्ट गेला असेल. रात्री ३ वाजता माझी सभा झाली हे कोणाला माहिती नसेल पण त्यांना माहिती आहे. कारण त्यांच्याकडे ती व्यवस्था आहे,” असा टोला नानांनी लगावला होता.

स्वबळाची घोषणा केल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. कुठेतरी आपल्याला पिंजऱ्यात आणण्याचा प्रयत्न करणार. फोन टॅपिंगबद्दल मी बोलले. पण माझ्यावर राज्य सरकारची देखील पाळत आहे, असाही आरोप त्यावेळी नानांनी केला होता. नानांचे हेच भाषण सोशल मीडियावरून फिरवले जाते आहे.

Nana patole hits on social media again; claimed he is being espinoged by CM and Dy CM

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात