प्रतिनिधी
मुंबई : कर्नाटकात काँग्रेसच्या विजयामुळे महाराष्ट्रात उत्साहात आलेल्या महाविकास आघाडीने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पुण्यात आणून त्यांचा सत्कार करून महाविकास आघाडीचे वज्रमूठ पुन्हा आवळायाचा निर्णय घेतला आहे.MVA to felicite karnataka chief minister to restart vajramooth sabha from pune
मध्यंतरी महाविकास आघाडीतले मतभेद उफाळून आले होते. ते कर्नाटकच्या विजयाने धुऊन निघाले असून महाविकास आघाडीने वज्रमूठ सभा पुन्हा सुरू करायचा निर्णय आज शरद पवारांचे निवासस्थान सिल्वर ओक मध्ये झालेल्या बैठकीत घेतला आहे. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, शिवसेनेचे नेते संजय राऊत आदी नेते उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांना नाना पटोले यांनी परखड शब्दात सुनावले होते. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या नेतृत्वालाही नानांनी टोचले होते. मात्र कर्नाटकात काँग्रेसच्या विजयामुळे महाविकास आघाडीतल्या मतभेद यांच्या फटी बुजल्या असून आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीची वज्रमूठ आवळण्याचा निर्णय या सर्व नेत्यांनी घेतला आहे.
महाविकास आघाडीचे जागावाटप या विषयावर सिल्वर ओक मधल्या बैठकीत प्राथमिक चर्चा झाली. ही चर्चा पुढे सुरू राहील आणि शांतपणे सौहार्दपूर्ण वातावरणात महाविकास आघाडीचे जागावाटपही होईल, असा दावा संजय राऊत यांनी केला, तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची निवड येथे एक दोन दिवसात होईल. नव्या मुख्यमंत्र्यांना पुण्यात आणून त्यांचा सत्कार करून महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा पुन्हा सुरू करायचा निर्णय घेतल्याने सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App