महाविकास आघाडीची यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये बैठक; आता आघाडीत मुख्य पक्ष कोण?? पाहा फोटो!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर दिलेल्या उत्तराच्या वेळी, तुम्ही केली त्यांची कोंडी म्हणून मारली आम्ही मुसंडी!!, असा अजितदादांवर कवितेचा मारा केला आणि महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीतले नेमके चित्र मांडले. महाविकास आघाडीतील महत्त्वाची सत्तापदे आणि मलईदार खाती राष्ट्रवादीकडे आली. अर्थमंत्री म्हणून अजितदादांनी त्यांच्यावर निधीचा वर्षाव केला आणि मुख्य पक्ष 56 आमदारांच्या शिवसेनेच्या तोंडाला पाने पुसली, असे देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारीनिशी विधानसभेत सांगितले. MVA meeting at y.b. chavan centre raised eyebrows over which is bigger party in MVA??, Shivsena or NCP??

आता तर शिवसेना फुटली आहे. मुख्य शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या रूपाने भाजपच्या आघाडीत मुख्यमंत्रीपदासह सत्तेवर आहे. त्यात भाजपकडच्या खात्यांना 66% आणि शिंदे गटात कडेच्या खात्यांना 34 % निधी दिल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले.

पण मूळात ज्या महाविकास आघाडीतला मुख्य घटक पक्ष अखंड शिवसेना जेव्हा 56 आमदारांसह सत्तेवर होता, तेव्हा निधी वाटपात त्याला तिसऱ्या क्रमांकावर ठेवणाऱ्या अजितदादांच्या राष्ट्रवादीने सध्या त्याच पक्षाची म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची नेमकी अवस्था काय केली आहे??, हे वर प्रसिद्ध केलेल्या फोटोतून दिसते!!

यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीला उद्धव ठाकरे, अजितदादा, बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण छगन भुजबळ वगैरे आघाडीचे नेते पहिल्या रांगेत बसले होते. अर्थातच माजी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची खुर्ची मध्यभागी होती आणि त्यांच्या एका बाजूला अजितदादा आणि दुसऱ्या बाजूला बाळासाहेब थोरात बसले होते.

पण या बैठकीत उद्धव ठाकरे जरी मध्यभागी बसले असले तरी त्यांच्या शिवसेनेची राजकीय स्थिती महाविकास आघाडीतला प्रथम क्रमांकाचा घटक पक्ष म्हणून शिल्लक राहिली आहे का??, हा प्रश्न निर्माण होतो आहे. कारण बरोबर त्यांच्या मागे लावलेल्या फ्लेक्स वर मध्यभागी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्ह आणि चिन्हाच्या एका बाजूला काँग्रेसचे हाताच्या पंजाचे चिन्ह आणि दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे मशाल चिन्ह ठळकपणे लावले होते. याचा अर्थ शिवसेना भविष्यकाळात महाविकास आघाडीतला पहिला किंवा दुसरा नव्हे तर तिसरा घटक पक्ष ठरणार का??, हा प्रश्न आहे. किंबहुना चिन्हांच्या रचनेतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाने सूचकपणे तसा राजकीय संदेश दिला आहे.

भले उद्धव ठाकरे यांना माजी मुख्यमंत्री म्हणून सन्मानपूर्वक मध्यभागी स्थान दिले असेल, पण आघाडीतला घटक पक्ष म्हणून शिवसेनेचे ठाकरे गटाचे स्थान आता तिसऱ्या नंबरचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थान आता मुख्य मध्यवर्ती पक्ष हेच यातून सूचित होते.

या बैठकीत उद्धव ठाकरेंनी न्यायालयावरच आता भिस्त आहे. तेवढाच आशेचा किरण उरला आहे. कारण केंद्र सरकार, राज्य सरकार पक्षपाती आहे. पत्रकारांच्या हातात कलमाऐवजी कमळ आहे. त्यामुळे न्यायालयावरच आमची आशा आहे, असे वक्तव्य केले आहे. भाषण म्हणून ते उत्तमच आहे. पण महाविकास आघाडीची यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये बैठक घेणे आणि राष्ट्रवादीचे चिन्ह मध्यभागी लावणे यातून जो राजकीय संदेश महाराष्ट्रात पोचतो आहे तो उद्धव ठाकरेंच्या राजकीय भवितव्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे!!

MVA meeting at y.b. chavan centre raised eyebrows over which is bigger party in MVA??, Shivsena or NCP??

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात