विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकार विरुद्ध सुप्रीम कोर्टात लढाई सुरू असतानाच प्रत्यक्ष मैदानावरच्या लढाईसाठी महाविकास आघाडीने एकत्र सर्वांचा धडाका लावण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्यासाठी आघाडीच्या नेत्यांनी घटक पक्षांमध्येच जोरदार स्पर्धा लावली असून अजितदादा पवार यांनी सर्वात मोठ्या सभेसाठी बक्षीस देखील जाहीर करून टाकले आहे. MVA parties decided to hol large Rallies in maharashtra
यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीला उद्धव ठाकरे अजितदादा पवार, अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, छगन भुजबळ आदी प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीतच महाविकास आघाडीच्या नियोजित सभांसाठी जबाबदारीचे वाटप निश्चित करण्यात आले आणि त्याचवेळी अजितदादांनी सर्वात मोठ्या सभेला बक्षीस देऊ, असे जाहीर केले. आता हे बक्षीस नेमके कोण मिळवणार?? आणि ते कोण देणार?? आणि ते बक्षीस नेमके कोणते असणार?? याची उत्सुकता आहे.
महाविकास आघाडीचा प्रसार सर्वदूर व्हायला पाहिजे. यासाठी प्रत्येक शहरातील सभेसाठी जोरदार नियोजन करा, असे पवारांनी यावेळी सांगितले. २ एप्रिलला छत्रपती संभाजीनगर येथे सभा होणार असून अंबादास दानवे नेतृत्वात ही सभा होईल.
काय म्हणाले अजित पवार ?
सभा यशस्वी करण्याची आपली सर्वांची सामुदायिक जबाबदारी आहे. सर्वांचे प्रतिनिधी दिसले पाहिजे. जी सभा सर्वात मोठी त्यांना बक्षिस मिळेल. महाविकास आघाडी एकत्रित आली की काय होऊ शकते हे विधान परिषद निवडणुकीतून पहायला मिळाले आहे. कसब्यात २८ वर्ष भाजपचा गड होता, तो गड पडला तेव्हा ते खडबडून जागे झाले. जसे सरकार आले ते सामान्य माणसाला आवडले नाही. आपल्याला महाविकास आघाडीच्या सभा घेत असताना एकोप निर्माण करण्याचे काम केले पाहिजे, असे अजित पवारांनी सांगितले.
आता महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनीच मोठ्या सभेसाठी स्पर्धा लावल्यानंतर कोण मोठी सभा घेतो??, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App