विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात एकीकडे कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक हिरीरीने लढवायची भाषा आणि महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाला एकजुटीने सामोरे जायची तयारी महाविकास आघाडीचे नेते करताहेत, तर दुसरीकडे याच महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे प्रमुख नेते एकमेकांमध्ये भांडत एकमेकांची धुणी सर्वजनिक नळावर धुवत आहेत. mva leaders claims to be together, but fight with each other day in and day out
सत्यजित तांबे एपिसोडवरून सुरू झालेली ही धुलाई आता काँग्रेस – राष्ट्रवादीच्या मार्गाने शिवसेनेच्या ठाकरे गटापर्यंत येऊन पोहोचली आहे. सत्यजित तांबे एपिसोड घडविण्यात अजितदादांचा हात होता. त्यांनी काँग्रेसमधल्या घराण्यांमधील भांडणे जाहीररित्या सांगितली, असा आरोप नाना पटोले यांनी केला, त्यावर तुमच्या घरातली भांडणे तुम्हाला घरातच सोडवता येत नाहीत, तर त्याला आम्ही काय करणार, असा पलटवार अजितदादांनी केला.
मधल्यामध्ये बाळासाहेब थोरातांनी नानांविरुद्ध काँग्रेसश्रेष्ठींकडे तक्रार करून नानांवर लेटर बाँम्ब फोडला. आता शिवसेनेचा ठाकरे गट अजितदादा आणि बाळासाहेबांनी न मागितलेल्या मदतीसाठी पुढे सरसावत नानांवर हल्लाबोल करता झाला.
शिवसेनेच्या ठाकरे गटाने सामनातून नानांवर हल्लाबोल केला आहे. महाविकास आघाडीचे सरकार पडायला नाना पटोलेच कारणीभूत ठरले. त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता, तर एकनाथ शिंदे यांच्याबरोबर फुटलेल्या १६ शिवसेना आमदारांना अपात्र ठरवून बंडाचा निकाल जिथल्या तिथे लावता आला असता, असा दावा सामनाने करून सरकार पडण्याचे खापर नानांवर फोडले आहे.
महाविकास आघाडीतल्या नेत्यांची एवढी भांडणे कमी झाली, म्हणून की काय शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी ठाकरेंची धुणी सार्वजनिक नळावर धुतली आहेत. उद्धव ठाकरे सहानुभूती मिळवायला खोटं बोलतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर मी त्यांची भेट घडवली होती. उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सोडून पुन्हा भाजपबरोबर युती करायला तयार झाले होते. पण त्यांना काँग्रेस – राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ५ वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद देण्याचे आश्वासन दिल्याची भुरळ पडली. त्यांनी पंतप्रधानांना दिलेला शब्द फिरवला, असा आरोप केसरकरांनी केला आहे.
आदित्य ठाकरे निवडून येण्यासाठी सचिन आहिर पासून अनेक तडजोडी कराव्या लागल्याचा गौप्यस्फोटही केसरकर यांनी केला.
पण एकूण जी महाविकास आघाडी कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक आणि विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन यांना एकजुटीने सामोरे जाण्याच्या बाता करते आहे, त्या महाविकास आघाडीचे नेते मात्र एकमेकांची धुणी सार्वजनिक नळावर धुतानाच दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App